पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वतःशी ओळख

--स्वतःशी ओळख ! 

--------

--नईदुनिया-इंदौर-पृष्ठ-१८-कॉलम -०१- " खुद से शादी रचाने वाली मॉडल ने दिया तलाक " गुरुवार, दिनांक : २५ नोव्हेंबर २०२१ च्या या बातमी प्रमाणे --ब्रज़िलिया देशातील एजेंसीची ही वार्ता आहे की ब्राजीलच्या एका मॉडेलने स्वतःशी लग्न केले नंतर स्वतःला घटस्फोट दिला.कारण तिला स्वतःपेक्षा श्रेष्ठ जोडीदार मिळाला आहे.यद्यपि तिने आपल्या जोडीदाराचे नाव सांगितले नाही . 

----------

--स्वतःशी ओळख !

-----------

--- ही बातमी वाचून माझ्या मनात सतत हा विचार येत आहे की स्वताला ओळखणे म्हणजे काय? स्वताला ओळखणे हा एक संभ्रम असतो का? स्वतःला नीट कोण ओळखू शकतो? इतरांनी आपल्याला नीट ओळखणे महत्वाचे, का नुसते स्वतः स्वताला नीट ओळण्याचा भ्रम बाळगून समाजात वावरणे महत्वाचे. कारण समाजाशिवाय माणूस राहूच शकत नाही. स्वतःला ओळखण्यासाठी काय योग्यता असायला हवी ? अर्थात वैचारिक प्रगल्भता असणे गरजेचे असते का ? स्वतःला ओळखण्यासाठी चिंतन मनन हे गरजेचे असते का ? स्वतःची आवड-निवड किंवा गरज भागवणे म्हणजे स्वतःची ओळख असते का? जर का आपल्याला स्वतःला नीट ओळखता आले तर आपला आयुष्याचा प्रवास सोपा होतो का ? वरील बातमी मधे स्वतःला नीट ओळखून स्वतःशी लग्न लावून घेणे असा भलताच प्रकार सामाजिकता आहे का ? विवाह संस्था याने संपुष्टात आलेली आहे का ? आणि मग स्वतःशी स्वतःचे लग्न लावून घेणे यात अपरिपक्वता आहे का ? हल्ली आपल्या इकडे जे लिव्ह इन चे प्रकार वाढलेले आहे तर ते पोरं स्वतःला नीट ओळखून च लिव्ह इन मध्ये राहतात का ? स्वतःला जर नीट ओळखून निर्णय घेतला आहे तर यात परिणामांचा विचार केलेला असतो का ? मूळ मुद्दा हा की स्वतःला संपूर्ण ओळखून निर्णय घेतल्या नंतर मग परत एकादा निर्णय बदलण्याची वेळ का यावी ? जर का प्रत्येक जण स्वतःला नीट ओळखू शकतो तर मग महाभारत आणि रामायण या सारखे अनेक युद्ध स्वतः ला नीट ओळखू न शकल्यामुळे झाले का ? माणूस स्वतःच्या अनुभवनाने ९० टक्के शहाणा होतो आणि शाळा कॉलेजातून फक्त दहा टक्केच शिकत असतो. कारण आयुष्य इतके सोपे सरळ नसते. आयुष्याचा हा प्रवास प्रत्येक टप्प्यावर फार खडतर असतो. 

---मूळ मुद्दा हा की स्वतःशी ओळख कशी व्हावी? कोण कोणते कारक याला सहायक असतात? समाज? कुटुंब ? मित्र ? संस्कार ? परंपरा का परिस्थिती ? तरुणवर्ग हल्ली समाजाचा विचार करत नाही. कुटुंब म्हणाल तर आजकाल एकल कुटुंब असल्याने, ' हम दो हमारे दो वरून हमारा एक किंवा हमारा कोई भी नाही ' अशी परिस्थती असल्याने संस्कार हा शब्द आता शब्दकोशातून विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे स्वतः घेतलेला अनुभव.ज्यामुळे माणूस शहाणा देखील होत नाही, तर या स्वतःच्या अनुभवाने त्याची स्वतःशी देखील ओळख होते.यातील एक महत्वाचे कारक म्हणजे माणसाचा स्वभाव. स्वतःला ओळखण्यासाठी स्वभाव हा फक्त पुरेसा आहे का ? स्वतःच्या स्वार्थ सिद्धीने आणि आत्मकेंद्रित मानसिकते ने माणूस परोपकाराची भावना विसरतो. आणि तो दुसऱ्या बद्दल विचार करूच शकत नाही, त्याची बाजू समजू शकत नाही. आत्म केंद्रित माणूस इतरांबद्धल विचार करत नाही आणि मग इतर देखील दुखावले जातात आणि त्याच्या पासून दुरावतात. मग स्वतःला नीट समजण्याची त्याची बौद्धिकता कमी ठरते. 

----स्वतःला ओळखण्यासाठी परस्पर देवाण-घेवाण या व्यवहाराची गरज महत्वाची असते, हे स्वतःला ओळखण्याचा दावा करणारे हमखास विसरतात. आम्ही आमच्यात च रमले राहू आणि इतर कोणाशीही आमचे काही देणे-घेणे नाही. अशा स्वतःला ओळखण्याचा दावा करणाऱ्या लोकांना समाज काय वागणूक देते ? म्हणजे एका काळा नंतर अशी माणसे आयुष्यात एकटी पडतात. इतरांना ही समजून घेणे किंवा ओळखणे महत्वाचे असते, पण ' एक मेका साहाय्य करू ' या विचारांना वाळीत टाकणारे हल्लीचे उच्च पगारदार राष्ट्रा द्वारे, समजा द्वारे, मिळणाऱ्या सर्व सुविधा सर्रास वापरून आपल्या कर्तव्याच्या वेळेस स्वतःला नीट ओळखण्याचा दावा करतात हे हास्यास्पद आहे. राष्ट्र आणि समाज आणि गोरगरिबांसाठी त्यांचे देखिल काही दायित्व आहे हे सोयीस्कर पणे विसरतात.  

------क्रमश:------

-----------------

विश्वनाथ शिरढोणकर, इंदूर. म.प्र. 

----------------------

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू