पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

टेंशन कायको लेनेका

 

टेन्शन कायकु लेनेका…


"मै जिंदगी का साथ निभाता चला गया...
हर फिक्र को धुये मे उडता चला गया...

परिस्थितीच्या जाळ्यात अडकल्यानंतर स्वतःच्या मनाला समजावणारा ओठात सिगरेटचं थोटुक धरून मस्त मजेत गाणारा देवानंद आठवतो? खरंच हे गाणं कितीतरी कितीतरी लोकांच्या मनाला आधार ठरलं असेल.. जेव्हा मनुष्य सर्व बाजूंनी हारतो तेव्हा हे गाण्याचे बोल मनाला राहत देतात..

थ्री इडियट मधला रांचो आठवतो?

अगदी टेन्शन न घेता बिनधास्तपणे जीवन जगणारा , मित्राच्या पाठीशी उभा राहणारा दुसऱ्यांना मदत करणारा... खरंच कुणाकुणाच्या वाटेला येतं हे असं जीवन?ही एक दैवी देणगीच असते की माणसाने स्वतःत निर्माण केलेलं आपला विश्वास ?

मानव जन्म फक्त एकदाच मिळतो..सुख आणि दुःख हे ऊन सावली सारखे जीवनात येतच असतात.. त्याचा सामना आपण कुठल्या प्रकारे करू शकतो हे ज्याच त्यांनी ठरवायचं असलं...
आनंद हा माणसाचा स्वभाव आहे... प्रथम तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करता दुःखी होणे निराश होणे थांबवा जग हे खूप सुंदर आहे.. प्राणी झाडं पक्षी आनंदाने गातात विहार करत असतात अगदी मुक्तपणे विहार करतात..संपूर्ण अस्तित्व आनंदी आहे पण माणूसच मात्र दु:खाला आपल्या उराशी कवटाळून बसतो, निराश होतो.. एकटेपणातील काळोखे अंधारात स्वतःला कोंडून घेतो.."

हे बोल आहे मिरॅकल मॉर्निंग या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या "हॅल एलराड" या लेखकाचे...

त्याची कसलीही चुकी नसताना हेल एका अपघातात सापडला. धडक ईतकी जोरदार होती की याच्या गाडीचा पार चकनाचुर झाला.. जवळ जवळ सहा मिनिटे हॅल मृताअवस्थेत होता.. डॉक्टरांनी मोठ्या शर्थीने त्याचे प्राण वाचवले. त्याची 11 हाडे तुटली होती.. डोक्याला प्रचंड मार लागलेला डॉक्टरांनी ह्याला सांगितलं तू आता यापुढे आपल्या दोन पायावर चालू शकणार नाही पण हेल कामात लिहिता जिद्दी होता त्याने आपल्या साऱ्या विकलांग अवस्थेवर कणाकणांनी मात केली इतकी एके दिवशी तो मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला.. स्वतः च्या मनाला आधार देत संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग…या पुस्तकात सांगितलेला आहे.

जे सध्या संकटाच्या फेऱ्यात त्यातून मार्ग काढण्याच्या धडपडीत असतील मग अडचणी काही असंच मानसिक ,भावनिक, शारीरिक आर्थिक ,परस्परा संबंधातील ताणतणाव...असतांना "द मिरॅकल" माॅर्निग खरंच असं पुस्तक आहे की ते खरंच तुम्हाला मै हू ना ? टेन्शन कायको लेनेका ? म्हणत मित्रत्वाची साथ देतं..

मी लिहिलेली एक कथा आहे..

"व्हॉट एन आयडिया मॅम ! "

नायिकेचे लांब सडक केस म्हणजे तिची समस्या असते.. केस खूप गळत असतात.. नवरा तिला बोलतो..ती नर्व्हस होते, केस कापून टाकायचे विचार मनात येतात.. आणि ती शेजारणी कडे जाते.. शेजारील सुनबाई तिला आयडिया सांगते.. ती आयडिया नायिकेला खूप आवडते आणि आपले घरभर पसरणारे केस ती बाथरूमच्या बेसिनमध्ये आणि तिच्या समस्येतून तुझी सुटका होते. ती म्हणते...

"आम्ही बायका जात्यात हुशार.. आयडियांचे आमच्याकडे असते भांडार..."

अशीच एखादी मैत्रीण आपल्याही ग्रुपमध्ये किंवा शेजारी असते.. थोडेफार जरी टेन्शन आलं आणि आपण तिच्याकडे मन मोकळे केलं की ते आपल्याला म्हणते ...

" टेन्शन कशाला घेतेस सगळं काही व्यवस्थित पार पडेल हाही दिवस निघून जाईल.." ‌. ‌. आणि त्या एका वाक्याने आपल्या मनाची स्थिती पालटते. तिच्या दोन शब्दाने आपल्याला कितीतरी आधार मिळतो दूर तरी असली तरी वाटते आपल्या खांद्यावर हात ठेवते आपल्याला आधार देत आहे अस वाटतं..
"घाबरतेस कशाला सगळं नीट होईल व्यवस्थित होईल.."
स्वतः संकटात सापडून दुसऱ्याला मदत करणारेही या जगात कमी नाहीत...

एक सिनेमाला आठवतो.. नायकाला नोकरीची गरज असते.. इंटरव्यूला आलेला इतक्या लोकांमध्ये नोकरी मिळेल की नाही याची त्याला चिंता असते.. आणि नायकाचा कॉमेडीयन मित्र एक युक्ती लढवतो... इंटरव्यू ला आलेले सगळे हळुहळू तिथुन निघून जातात आणि नायकाला नोकरी मिळते.. तर असे हे जिगरबाज पूर्वीच्या सिनेमात दाखवायचे.. चिंतेत असलेल्या मित्राला हसत हसत समस्येतून सुटकारा मिळवून देणारे... अशी भूमिका नाही होणारे सिनेमातले जॉनी वॉकर किंवा मेहमूद तुम्हाला नक्कीच आठवत असेल..


घाबरल्याने चिंता सुटत नसतात ..उलट वाढतात सगळ्या संकटाला परिस्थितीला हसतमुखाने सांभाळायचं ..ते संकट संकट वाटतच नाही ते एक आव्हान वाटते आणि माणूस ते आव्हान पेलण्यास तयार होतो... स्वतःच्या मना इतका सच्चा मित्र जगात इतर कोणीही नाही ...तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा आणि जगायला शिका.. आपण आपल्याच पाठीवर विश्वासाने थाप देत म्हणा.

 मै हुं ना.. टेन्शन काय कू लेता..?

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू