पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ते चोवीस तास

मनात साचेलेले विचार शब्द रूपाने ह्या ऑनलाइन महासागरात विसर्जित ...

तारीख २७ ऑगस्ट २०२०
सकाळी ७  वाजता
दादा लवकर ये पप्पांना दुसऱ्या हॉस्पीटल मध्ये शिफ्ट करावे लागेल. श्वास घेताना त्रास होतो आहे. जवळच्या हॉस्पीटल मध्ये बेड मिळत आहे . 

"अरे गाडीची काच खाली कर मला दम लागल्या सारखे होत आहे. बरं करतो  तुम्हाला काही होणार नाही काळजी करू नका पप्पा."

सकाळी ८ वाजता
हे कोविड हॉस्पीटल आहे त्यामुळे काही नियम पाळावे लागतात. तुम्ही एडमिशन फीज भरून द्या. आणि ही काही औषधे लिहून दिली आहेत ते लगेच घेऊन या.

काका तेवढे इन्शुरन्स कंपनी ला कळवा बँकेची ग्रुप पॉलिसी आहे ना.

सकाळी ९ वाजता
त्यांचा कालचा सिटीस्कॅन रिपोर्ट आला नाही तो घेऊन येऊ, तिकडे सारसबाग कडे जावे लागेल. येताना आपली टेस्ट पण कुठे करायची ते पाहावे लागेल.

रिपोर्ट स्कोर १८ आहे त्यामुळे जरा अवघड आहे. आपण बघू पेशंट कसा रिस्पॉन्स देतो ते.

सकाळी १० वाजता.
पेशंट ला इथे साधारण १५ दिवस तर राहावे लागेल. घरचे जेवण नाही देवू शकत.  ह्या अरेंज करतील. काही advance देवून ठेवा.

घरच्या साठी काही नाष्टा घेऊन जाऊ कोणी काहीच खाल्ले नाही.

सकाळी ११ वाजता
काल पासूनच त्यांना त्रास सुरू झाला. कसा ते माहित नाही. शेजारी पाजारी कळले तर हे असे कोवीड चे.

आज गणेश विसर्जन आहे ना. संध्याकाळी करू घरीच.

दुपारी १२ वाजता
पेशंटची पोझिशन जरा क्रिटिकल आहे. ओटू लेव्हल वाढत नाही. काही सांगता येत नाही.

नातेवाईकांना सागितले  आहे. काही लागले तर कळवा म्हणांत्तात. पण situation अशी आहे की कुणी काही करू शकत नाही.

दुपारी १ वाजता

तुम्ही जेवून घ्या जरी भूक नसली थोडेतरी खावे लागेल.

आपण लकी आहोत  हॉस्पीटल मध्ये  जागा मिळली. नाहीतर बातम्या मध्ये पाहतो आहेच ना.

दुपारी २ वाजता

घड्याळचे काटे आणि पंखा फक्त ह्यंचाच आवाज येत आहे. हि शांतता फार भयानक आहे.

जरा ऑफिस चे काम करतो कदाचीत दुसरे विचार येणार नाहीत.

दुपारी ३ वाजता.
जरा चहा घ्या बरे वाटेल कुणी झोपले नाही वाटते.

तुम्हीच मोठे का लवकर  या हॉस्पीटल मध्ये पेशंटची स्थिती नाजूक आहे.
दुपारी ४ वाजता.
डॉक्टर राऊंड वर आहेत , तुम्ही बाहेर वाट पहा. बाकी काही आम्हाला माहीत नाही.

अशी वाट पाहणे जीवावर आले आहे दाद्या.पण काही उपयोग नाही.

संध्याकाळी ५ वाजता.
आम्ही बरेच प्रयत्न केले पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही.
तुमच्या पेशंटला आम्ही वाचवू शकलो नाही.

डॉक्टर पुढची प्रोसेस काय असेल ते सांगा.

संध्याकाळी ६ वाजता.
मित्रा वडील गेले रे , एकटे वाटते लवकर ये.

आईला कसे आणि कधी सांगणार, कदाचित तिला कळून चुकलं असेल.
संध्याकाळी ७ वाजता

ते पिपीइ किट तुम्हाला आणावे लागेल, पेशंट साठी सरकार फ्री देते आहे.

सकाळी दिलेल्या advance मधून उरलेल्या पैशांचा चेक तुमच्या नावावरच देते.
रात्री ८ वाजता
Ambulance रात्रि १० वाजता येईल. तो पर्यंत तुम्ही घरी जाऊ शकता.

गणपती विसर्जन करून घेऊ , गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.
रात्री ९ वाजता.
शेजारच्या घरातून जेवण आले आहे जेवण करून घ्या

तुम्हाला त्यांना शेवटचे पाहता येईल डॉक्टरने परवानगी दिली आहे.

रात्री १० वाजता
तुम्ही हात लावू नका , हॉस्पीटल चे कर्मचारी लावतील. " अहो त्यांना ठेवता येत नाही मुलगा आहे मी ह्यांचा"

येतो म्हणून सांगून गेले पण परत आलेच नाही घरी.
रात्री ११ वाजता
हे बघा इथे गर्दी फार आहे साधारण चार पाच तास तरी लागतील.
तुमचा नंबर यायला

ही बॉडी सहा नंबरच्या फ्रिझर मध्ये ठेवा.
रात्री १२ वाजता
अजून गर्दी वाढत चालली आहे. इथे सुद्धा नंबर लावावा लागेल असे वाटले नव्हते.
रात्री १ ते पहाटे ४
खरच कुणी कुणाचा नसतो, ही स्मशान शांतता फार मोठी जाणवत आहे.

अशी वाट पाहणे फारच त्रासदायक आहे
पहाटे ५ वाजता
तुमचा नंबर आला आहे एकदा शेवटचे पाहून घ्या आणि कन्फर्म करा.

साहेब काही खुशी मिळेल का. अरे मित्रा हे  ठेव पैसे आणि ही खुशी नाही रे , माझे अग्नी द्यायचे काम तू केलेस ना म्हणून.

पहाटे ६ वाजता
तुमचे  अस्थी चे मडके तयार आहे ताब्यात घ्या.

चला रे पुढची बॉडी घ्या लवकर आज काम फार आहे.
तारीख २८ ऑगस्ट २०२०
सकाळी ७ वाजता.
एक नवा दिवस एक नवी सुरवात पण तुमच्या शिवाय

हेमंत कदम
२७/०८/२०२३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू