पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सेकंड इनिंग

..... *यादोंकी बरसात (१९)

*१३ ऑगस्ट २०२३*
Second Innings मधला सर्वात आनंदाचा दिवस...

तसे तर आता रिटायरमेंटनंतर
घाई गडबड नसते. घड्याळाच्या काट्यावर धावायचे नसते. जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात .. सगळा आनंदीआनंदच असतो...

तुम्ही म्हणाल, मग हा एकच दिवस असा काय वेगळा आनंद घेऊन आला होता?..अरे..हो हो
थोडे थांबा जरा...लेख शेवट पर्यंत वाचला की आपोआप उत्तर मिळेल त्याचे...

या दिवशी मला आयुष्याच्या
Second Innings मध्ये (मला तर त्याला आयुष्यातील चौथा टप्पा म्हणावेसे वाटते) लेखन स्पर्धेत, स्त्री विभागात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले... स्पर्धा म्हटली की प्रत्येकाची एक सुप्त इच्छा असतेच की आपला नंबर यावा...मी तरी याला अपवाद कशी असेन !!

पण इतक्या लवकर ही इच्छा पूर्ण होईल असे मात्र वाटले नव्हते...

*Sbi Pensioners' Association* तर्फे दरवर्षी लेखन स्पर्धा घेण्यात येते...या वर्षीचे विषय होते..

१. *संवाद स्वतःचा स्वतःशी*
२. *मोबाईलचा अतिरेकी वापर*

मी.. " मोबाईलचा अतिरेकी वापर " या विषयावर लिहिले होते.. स्पर्धेचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागला... निकाल ऐकून खरतर आधी माझा
विश्वासच बसला नाही.

थोड्याच वेळात मित्र मंडळींचे फोन/ Msg यायला लागले आणि मग काय !! आनंद द्विगुणित झाला हे वेगळे सांगायलाच नको...त्या आनंदात घरची मंडळी, मित्र परिवार सर्वच सहभागी झाले...

त्याक्षणी लिखाण ही कोरोना काळातील गिफ्ट म्हणावी की काय असेही वाटून गेले...कारण मी लिखाणाची सुरुवात त्याच काळात केली होती. कोरोना काळात रोज रोज टीव्ही वर, वर्तमानपत्रात सर्वांना हादरवून सोडणाऱ्या, मन सुन्न करणाऱ्या, किती बातम्या यायच्या हे मी वेगळे सांगायची
गरज नाही..

घरातील कामे आटोपल्यावर, काय करणार? ...कुठे जायचे नाही
की कुणाशी समोरा समोर उभे राहून बोलायचे नाही म्हंटल्यावर, फोन/मोबाईल हा एकच मार्ग उरला होता..जोक्स करणे, कॉमेंट्स करणे, आलेले msgs पुढे ढकलणे, सर्व हे करूनही कंटाळा आला....मग आम्ही मित्र मंडळींनी आपल्या आवडीचे काहीतरी वेगळे करायचे ठरवले...
आणि विरंगुळा म्हणून लिहिता
लिहिता आजचा आनंदाचा दिवस आला...

शाळा, कॉलेज, संपल्यावर लिखाणाशी तसा काही संबंधच राहिला नव्हता...बँकेत तर काय?..
One - to - Hundred, डेबिट -
क्रेडिट, आणि खऱ्या - खोट्या
नोटा ओळखता ओळखता सर्विस संपली....नाही म्हणायला होमलोन
मार्केटिंग हा एक वेगळा अनुभव घेतला...

शाळा, कॉलेज मध्ये अभ्यासात आणि खेळात प्रथम पारितोषिक मिळवली, वैयक्तिक
चॅम्पियनशिप मिळवून झाली..होम लोन मार्केटिंग मध्ये सात गृहतारा, Incentive मिळवून झाले..आणि आज Second Innings मध्ये हे एक लेखन स्पर्धेतील बक्षीस !!

थोडक्यात काय तर आयुष्याच्या चारही टप्प्यात म्हणजे शाळा, कॉलेज, बँक, आणि आता रिटायरमेंट नंतर, स्पर्धा जिंकल्या .

अजून एक योगायोग सांगावासा वाटतो...

मला कॉलेजच्या पहिल्या वर्षी खोखो मध्ये एक दहा रुपयाचे बक्षीस मिळाले...आणि पुढील
चारही वर्षी मला प्रत्येक स्पोर्ट्स मध्ये बक्षीसं मिळाली...

आणि ज्या दहा रुपयाच्या नोटेवर, जून २०२३ मध्ये मी लिहिलेला "एक नोट १० ची, लाख मोलाची" हा लेख छापून आला होता, त्याच्या पुढच्या महिन्यात झालेल्या लेखन स्पर्धेत मला प्रथम क्रमांक मिळाला...

ती दहाची नोट जशी मला लकी ठरली होती, तसाच त्यावर लिहिलेला लेखही मला लकी ठरला.....

१३ ऑगस्टला *नेरूळ* , नवी
मुंबई येथे *Annual Gen. Meeting* होती....with चहा, नाश्ता, जेवण,आईस्क्रीम आणि एक प्रेमाचे गिफ्ट....

माननिय Chief Guest *श्री.अरविंद कुमार सिंग साहेब* ( Chief Gen. Manager,
(Maharashtra Circle.)

*श्री.श्रीराम सिंग*
(Gen. Manager NW1, Maharashtra Circle)

*श्री.राजकुमार छाब्रिया साहेब* (Secretary, Mumbai Metro) ,

सर्व Circle Office Bearers...

*श्री.प्रदीप देशपांडे*
(President)
*श्री.सुधीर पवार*
(Gen.Secretary)
*श्री.प्रवीण कुलकर्णी*
(Secretary)
*श्री.विष्णू मुकिम* (Treasurer)

*लेखन स्पर्धा आयोजक*, *आणि परीक्षक*, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला..

श्री.छाब्रिया साहेबांनी आपल्या सर्व शंकाकुशंकाचे निराकरण केले..आपल्या सवलती समजावून सांगितल्या..खरेतर आपण सर्वांनी, आणि जे असोसिएशनचे मेंबर नाहीत त्यांनीही असोसिएशनचे सभासद व्हावे व आपली असोसिएशन युनियन stronge करायला हवी..
कारण एका माणसाचा आवाज दाबून टाकता येतो, पण Unity चा
आवाज सहजासहजी दाबून टाकता येत नाही...

इतर Office Bearers नी आपापल्या कामाबद्दल, सर्विस्तर सांगितले...

दुपार नंतरच्या सत्रात, *श्री. धूपकर साहेब* यांनी *"संवाद" अंका विषयी* माहिती दिली, अंक मिळत नाही त्या तक्रारींची नोंद घेतली, त्यांचेही काही प्रोब्लेम असतात ते समजावून सांगितले..

निवृत्तीनंतरही अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांचे मान सन्मान करण्यात आले...आणि मग सर्व लेखन स्पर्धक वाट बघत होते तो अत्यानंदाचा क्षण आला...
..
*लेखन स्पर्धा...बक्षीस वितरण समारंभ*...

मला *सौ.उज्वला सावे मॅडम, Retired Deputy Manager* ह्यांच्या हस्ते, बक्षीसाचे पाकीट आणि पुष्पगुच्छ देण्यात आले...

त्या पाकीटात किती रकमेचा चेक होता, याहीपेक्षा, त्या चेकच्या
रुपात माझ्या पुढील आयुष्यात मला लेखनाला स्फूर्ती देणारा आनंद दडला होता.. जो कधीही..
" Encash " होऊ शकणार नाही..
असा अमूल्य आनंद!!

पुष्पगुच्छातील ही फुले उद्या कोमेजतील, सुकतील, पण आजचा त्याचा सुगंध मात्र माझ्या भोवती कायम दरवळत राहील... कारण त्यासोबत सर्वांच्या शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होता.. तो सुगंध मी मनाच्या कुपीत भरून ठेवला आहे ..

पुरुष विभागात श्री.सूर्यकांत भोसले साहेब यांचा प्रथम क्रमांक होता...

खूप आनंद झाला की माझा
*आनंद गगनात मावेना*, असे आपण म्हणतो..आज हा वाक्प्रचार आम्ही प्रत्यक्षात अनुभवला..

कारण त्या कार्यक्रमात, खऱ्या अर्थाने.. *गगनभरारी* घेणाऱ्या...
*चांद्रयान २ आणि ३,या इस्त्रोच्या (ISRO) टीममध्ये Project Manager* म्हणून काम करणाऱ्या...Sr.Scientist *डॉ. मिसेस. माधवी ठाकरे मॅडम*.. हजर होत्या...
सौ. माधवी मॅडम, आपले मूर्तिजापूर येथील पेन्शनर बांधव *श्री.विजय बापूराव फूके, आणि सौ. अरुणा विजय फूके*, यांची कन्या आहेत....

सोबत त्यांचे पती श्री.सचिन ठाकरे, मुलगी, आणि आईवडील होते...

*सौ. माधवी मॅडमनी भाषण केले..आणि या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने*... *चार चाँद* .. लागले. तो सोहळा याची देही, याची डोळा बघायला मिळाला ..ही आमच्या सर्वांसाठी पर्वणी होती... अशी संधी पुन्हा मिळणार नाही हे नक्की... त्यावेळी टाळ्यांचा जो कडकडाट झाला त्याने हॉल मधील प्रत्येकाचे कान तृप्त झाले...शिवाय ढोल ताशे वाजत होते ते वेगळेच.. तो आवाज प्रत्येकाच्या कानात कायम असाच दुमदुमत राहील...

तो आपल्या pensioners' Association च्या काळातील एक... *ऐतिहासिक सुवर्णक्षण*.. ठरला..

उच्च विद्याविभूषित सौ. माधवी ठाकरेंबद्दल, कितीही लिहिले तरी कमीच आहे...तरीही *त्यांनी मिळवलेल्या Degree आणि Awards बद्दल थोडक्यात*
सांगायचा प्रयत्न करते..

.... Doctor of Philosophy
(Ph D) (physics)....
....Master of Business Administration....
....Master of Science.(M.Sc) (Physics)

.....Award of Team Excellence...in 2017
......SAC Innovation Award....in 2018
.....Award of Excellence of work...in 2021
..... Maharashtra's Savitri Award...in 2022

साधी सरळ रहाणी,बोलण्यात
नम्रता आणि मृदूभाषी असणाऱ्या, आपल्या यशाचे सर्व श्रेय आईवडिलांना देणाऱ्या, त्यांचे कष्ट आणि ऋण यांची सतत जाणीव असणारी, आकाशाला हात पोहचले तरी, जमिनीवर पाय घट्ट रोवून उभी असणारी, आपल्या Sbi Pensioners' कुटुंबाची लेक असणाऱ्या सौ. माधवीला बघून म्हणावेसे वाटले की ..अरे आपण तर फक्त लेखन करतो, आणि...

*माधवी ठाकरें सारख्या स्त्रिया इतिहास रचतात... त्यांचे नाव इतिहासात लिहिले जाते* ...

*श्री. सचिन ठाकरे साहेबांबद्दल* सांगायचे तर...
...Degree in Computer
Science
.....MBA in HR
.....SHAIP.AI Data India मध्ये
HR dept. ला Senior Vice President म्हणून कार्यरत आहेत....
तसेच MNCs आणि Indian Companies मध्ये त्यांचा पंधरा वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे.

सौ.माधवी मॅडम, श्री.सचिन ठाकरे साहेब, सौ.व श्री. फूके साहेब, यांचा Circle CGM, GM,
SBIPA यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला...

Chief Guests आणि सर्व मान्यवरांना सन्मानाने व्यासपीठावर आणण्याचे काम *श्री.मोहन पवार साहेब, श्री. संदीप पावसकर साहेब, आणि इतर पदाधिकाऱ्यांनी* केले..

कार्यक्रम म्हंटला की... *सूत्रसंचालन..Anchoring*.. हा एक अविभाज्य घटक असतो....
त्याची धुरा ...*सौ.डोंगरे मॅडमनी, Retired AGM*, त्यांच्या उत्साहवर्धक शैलीने, कार्यक्रम पुढेपुढे नेत अतिशय सुंदरपणे सांभाळली...मॅडमची पाहुण्यांचे स्वागत आणि त्यांच्याबद्दल माहिती
सांगण्याची कला अप्रतिम आहे...

शेवटी मला म्हणावेसे वाटते की, माझ्यासाठी माझ्या " यादोंकी बरसात " या लेख मालिकेत अत्यानंदाचा पाऊस पाडणारा, ऐन
पावसाळ्यातील १३ ऑगस्ट हा अविस्मरणीय पावसाळी दिवस ठरला...

*सौ.सरोजिनी बागडे*
डोंबिवली,
Mob.No.9833556629

दि..२१.०८.२०२३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू