पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आला धुंदीत श्रावण

अष्टाक्षरी रचना


आला धुंदीत श्रावण????


आला धुंदीत श्रावण

गीत पर्जन्याचे गात

जलधारा बरसल्या

आल्या नाचत नाचत


चिंब भिजली धरणी

अंगोपांगी बहरली

कंच हिरवी पैठणी

ल्याली मृदु मखमली


 मोर , पर्ण सुमनांचा 

नृत्य करी  पल्लूवरी

रावा,हिरवा सुंदर 

बसे,साडी कांठावरी


तृण फुलांचा सुरेख 

साज ल्यायली धरणी

जल  थेंबांचा माळला

केशी,गजरा अवनी.


 गंध फुलांचे शिंपण

 वसुधेच्या कायेवरी

रोमरोमी मोहरली 

हर्ष  भरे चराचरी.


ओल्या श्रावणांत असे

रेलचेल हो सणांची

उत्साहाने   भरलेल्या

मजा, और,श्रावणाची


घननिळ्या श्रावणांत

सज्ज,झाली ही सुंदरा

पूजनास, निसर्गाच्या 

मनोभावे वसुंधरा


सौंदर्याने नटलेला

मांगल्याने भारलेला

आला नाचत श्रावण

धुंद हा  गंधाळलेला


सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू