पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जगाचा वाली

जगाचा वाली


जगाचा वाली कान्हा तू

नारीसाठी का धावत नाही

रस्त्यात घडते पाप जेव्हा

हतबल असतो कुठल्या ठाई …..


निघते नारी जेव्हा रस्त्यावरी

राक्षस उभे  का दारोदारी

माणूस माणसापरी वागत नाही

पाप घडते तुमच्या सामोरी ……


नारी बघून विसरतात माणुसकी

कवच बन तू तिच्यासाठी

द्रौपदी सारखा पाठीराखा होऊन

धाव हरी तिच्या रक्षणासाठी ……


       सुरेखा नंदरधने✍️



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू