पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मैत्रिचा हिंदोळा

मैत्रिचा हिंदोळा!


मैत्रिच्या नावाचा सखे

बांधला कुणी हा झुला

आठवांच्या हिंदोळ्याने

कसा झुलतो हा झुला!


झोका घेता जातो वरी

खाली येता मिठी भरी

उर दाटुनी येताच

अश्रू वाहे गालावरी!


हृदयावरचा भार

सखे झाला गं हलका

ओझे  घेवुन चालत

होते मनी हा गलका!


साथ तुझी गं लाभली

करण्या गं हितगुज 

आज सारे माझे राज 

ठेव मनात गंं गुज!


सौ. छाया हरिभाऊ राडे

वर्धा

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू