पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जवान सिनेमा एक शिकवण


एखादे प्रॉडक्ट जेव्हा मार्केट मध्ये आणतो तेव्हा ते यशस्वीपणें सगळीकडे स्वीकारले जावे ही सर्वच कंपनीची अपेक्षा असते. बिझनेस मॅनेजमेंट कॉलेज मध्ये ह्यावर एक धडा असतो.पण हीच शिकवण अगदी कमी पैश्या मध्ये मिळाली तर ती जरूर घ्यावी.
अशीच काही नवीन गोष्टी , नावाने जवान अन् वयाने मोठ्या अश्या खान चाचा नी त्यांच्या नवीन सिनेमात दिल्या आहेत.
जवान फिल्म हे एक यशस्वी प्रॉडक्ट झाले आहे आणि त्यामध्ये काही  शिकवण दडली  आहे ते आपल्याला माहीत हवे म्हणून हा लेखनप्रपंच आता कुणी त्याला उगाच अगावपणा म्हणेल तरी असो.

शिकवण खालील प्रमाणे...

1.जे लोकांना हवे आहे ते द्यावे. - लोक शाहरुख ला पहायला येणार आहेत त्यामुळे त्यांना तेच द्या एकाने होत नसेल तर दोन द्या.  बाय one गेट one फ्री . उगाच काही नवे देण्याच्या भानगडी मध्ये न पडता जुने तेच नवीन वेष्टण मध्ये द्यावे.

2. प्रॉडक्ट पॅकेज आकर्षक द्या - एकच गेटअप पुर्ण फिल्म पाहून बोर होणार म्हणून  पाच ते सहा गेटअप द्या. जो तो ग्राहक निवड करेल.

3. टारगेट कस्टमर ओळखा.-  स्त्री वर्ग हा सगळ्या प्रॉडक्ट चा अविभाज्य भाग असतो. जरी तो प्रॉडक्ट त्या वापरत नसल्या तरी. आणि ह्या फिल्म मध्ये तर स्त्री वर्गाची भरमार आहे. आई बहीण ,मुलगी, प्रियेसी, विद्यार्थी अश्या अनेक जणींनी दर्शन दिले आहे. त्यामुळे गर्दी वाढत चालली आहे.

4.एक सामाजिक संदेश द्यावा.  उगाच लोकांना उपदेश देण्या पेक्षा जे त्याना माहीत आहे आणि कळते पण वळत नाही असे काहीसे सामाजिक संदेश देत रहावे. जसे सिगारेट पिऊ नये ,  होणार काही नाही पण उगाच तुमच्या प्रॉडक्ट ला सामाजिक आशय मिळेल. आणि त्या बॉयकॉट ची निगेटिव्ह पब्लिसिटी होणार नाही.

5.बजेट ची चिंता नसावी. - जसा पैसा, पैशाला  आकर्षित करतो. तसे जर तुमचे टारगेट जास्त रक्कम यावी असे असेल. तर त्या प्रमाणत खर्च पण झाला पाहिजे. असू दे सोड होऊ दे खर्च हा भाव ठेवून ह्या फिल्म मध्ये पेसा ओतला आहे.

6. प्रॉडक्ट लोकल से ग्लोबल असावे. - काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आपले प्रॉडक्ट पोहचले पाहिजे. साऊथ चा director, नायिका, खलनायक, music पण तिथले, आणि हिरो मात्र ,नॉर्थ इंडियन पण ग्लोबल. मेट्रो पुण्यनगरीतील, आणि बाकी तो खलनायक जरा धूमधडाका मधील अशोक सराफ सारखा दिसतो.असा काही मराठी संबंध.

अजून काही शिकवण तुम्हाला जाणवली असेल तर कळवा

हेमंत कदम
14/09/2023

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू