पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संजीवनी

संजीवनी 


काही नात्यात देणे, घेणे,

व्यवहार, विचारपूस;

जरी नसली तरी,

आधार असतो.

ते नाते आपल्या; 

आईसारखेच असते;

पावलोपावली साथ करते;

मनापासून विश्वासाने; 

जगापुढे आश्वासन ठेवते;

छोट्या मोठ्या गोष्टींचा;

आपण करतो बावू,

तिच्यासाठी अजून आपण;

चिमुकलेच राहू,

कधी नाही मनाला लागत,

आमची टोचून बोलणी;

अशी ती आहे म्हणून, 

आमची पर्वणी.

आयुष्यभर आहोत;

आम्ही तिचे ऋणी,

आज मावशी तुझा वाढदिवस,

मिळो तुला चांगले आरोग्य,

हिच प्रार्थना ईश्वर चरणी. 

तुझी अजून सोबत,

आम्हाला हवी आहे,

सुंदर अश्या जगात,

तू दुसरी आई आहेस.

रखडलेला संसारात;

तुझा पाय जरी,

तुला आमची काळजी,

आई इतकीच खरी.

संथ तुझी बोली,

निरागस चिंता असताना,

आईची सोबतीण पुन्हा, 

आम्ही जवळ नसताना.

भावंडानी भरलेले घर,

आता नातवंडांनी भरले;

तुझ्यासारखी तुझ मावशी,

अशी मीरा कुठे भेटेल. 

सगळ्याचे स्वागत,

करतेस जोरदार,

नाही तिला कंटाळा,

नसते कुठलीच तक्रार.

तुझ्याकडून खूप काही;

शिकण्यासारखे आहे,

तुझ्या इतके सोयीस्कर,

आम्हाला बनायचे आहे. 

तुझा Unlimited Data,

हेच आम्हाला blessing;

अशीच रहा तू चिरंजीवी,

बनून सगळ्याची संजीवनी.



सौ. चंद्रलेखा धैर्यशील जगदाळे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू