पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विसर्जन

तू येतोस, तू जातोस.. असे म्हणून उगाच आम्ही मिरवतो..

तुला आम्ही आणले, तुला आम्ही बसविले, तुला आम्ही नैवेद्य केला आणि आम्हीच तुला विसर्जित केले..
अनादी, अनंत तू एक.. तुला आम्ही काय बनवणार आणि काय बुडवणार..

अनंत पिढ्या आल्या...अनंत पिढ्या गेल्या....तू तरीही इथेच आहेस.. इथेच असणार आहे..

काळ ना कधी थांबेल, ना तो कधी संपेल. आमच्या आधीही तो एक, आमच्या नंतरही तोच एक. त्यास आमची गरज नाही.
त्याच प्रमाणे तूही अनंत. तुजला आमची केवळ दहा दिसांची काय गरज? आमच्या आधीही तू, आमच्या नंतरही तू. शक्ती तू, युक्ती तू, बुद्धी तू, विघ्नहर्ता तू..

मग काय हा उत्सव दहाचं दिसांचा? का न करावा तो रोजचा?
आपुले येणे, आपुले जाणे, त्यामधले क्षणभंगुर हे जगणे....
जगण्याचाच या उत्सव करावा. अन् रोजचं तुला मनी बसवावा....
आरास करावी विचारांची, रोषणाई मनातल्या प्रेमाची...
नैवेद्य दाखवावा सत्याचा, फुले दया, क्षमा, शांतीची....
अन् आरती सुंदर शब्दांची....

रोजचं क्रोध, मोह, मत्सर विसर्जित व्हावा. हिशोब आजच्या भावनांचा आजचं पूर्ण व्हावा...
असा तुला रोजंच का न पुजावा?....

रोज नव्याने मनी तो असा जागवावा. अन् उत्सव आयुष्याचा रोज नव्याने साजरा व्हावा..

।। मंगलमूर्ती मोरया ।।

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू