पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रिमझिम पाउस धारा

               रिमझिम पाउस धारा

ढ़ग भेटता डोंगराला
आल्या रिमझिम रेशिम धारा
गांवा मंधे थुइ -थुइ नाचला
पिसाटलेला मग तो वारा.

परदेशी असतो साजण
भरुन डोळे पाहे ती नभाला
त्रास किति ही झाला तरी तू
लवकर ये रे घरच्या दारा.

काळी माती खुलून हसली बियाणा ला नव अंकुर आले
पशु -पक्ष्यात उत्साह संचरला
मोराचा पण खुले पिसारा.

घरा मंधे पाणी साचले
मजूरीला जाणे नाही जमले
पोरं भूकेनी जाम त्रासले
देवाचा बस आता सहारा.

ढ़ग भेटता डोंगराला
आल्या रिमझिम पाउस धारा
गांवा मंधे थुइ -थुइ नाचला
पिसाटलेला मग तो वारा.
@रामचन्द्र  किल्लेदार, ग्वाल्हेर 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू