पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सुंदर पत्रे

पुस्तक आढावा
पुस्तकाचे नाव- सुंदर पत्रे भाग 1,2 व 3
लेखक- साने गुरुजी
एकूण पाने - 312

पब्लिकेशन - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर
riyapublications@gmail.com
प्रमुख वितरक - अजब डिस्ट्रिब्युटर्स ajabpublications@gmail.com
मुळ किंमत- 390 रु.
सवलत मूल्य- 60 रू.

पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी म्हणजे मराठी साहित्यातील एक मोठं नाव. ज्यांनी श्यामची आई, बेबी सरोजा इ. सारखी करुणरस प्रधान साहित्य आपल्याला दिलं. लहानपणी 5-6वी ला असताना माझ्या अवांतर वाचनाची सुरुवात श्यामची आई या करुणरस प्रधान पुस्तकांनी झाली. त्यांचं बेबी सरोजा' हे पुस्तक देखील करुण रसप्रधानच आहे. मग तेंव्हा वाटलं की, साने गुरुजींचं लेखन म्हणजे फक्त हाळवं लेखन. आता कालांतराने हे पुस्तक वाचल्यानंतर ते तत्वज्ञान आणि मूल्य शिक्षणावरदेखील चांगलं लिहितात हे समजलं.

या पुस्तकात त्यांनी लिहिलेली एकूण 42 पत्रे आहेत म्हणजेच भाग 1, 2 आणि 3 यांचं ते संकलन आहे. सुधा त्यांची लहान बहिण आणि तिच्या मैत्रिणी यांना लिहिलेली ही पत्रे पुस्तकाच्या नावाप्रमाणेच अतिशय सुंदर आहेत. आजच्या 21व्या शतकाच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात आता पत्र लिहिणे ही गोष्ट खूपच दुर्मिळ झाली आहे, त्यातल्या त्यात कौटुंबिक पत्रे लिहिली तर ती फक्त विद्यार्थीच त्यांच्या परीक्षेत फक्त गुण मिळवण्याकरता त्यांच्या भाषाविषयात. इतर ठिकाणी आता
e-mail, WhatsApp, Facebook Chat Messenger वर short message नेच काम भागतं.पत्र लिहिताना मायना काय लिहावा ? पत्राचे परिच्छेद कसे करावेत ? पत्राचा शेवट कसा करावा? या गोष्टींचं ज्ञान हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच सगळ्यांनाच होईल. मला वाटतं की, साने गुरुजींचं लेखन आता कॉपी राईट मुक्त झाल्यामुळे ब-याच प्रकाशकांनी ते कमीतकमी किंमतीत उपलब्ध करून दिले आहे.
          या पत्रातून साने गुरुजींची जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक वृत्ती, निसर्गातील विविध घटकांकडे पाहण्याची त्यांची सूक्ष्म दृष्टी, सेवादलातील त्यांचं निस्वार्थ काम आणि त्यातील गोड,कटू आठवणी त्यांनी या पत्रात मांडल्या आहेत. साने गुरुजी हे सोप्या आणि सरळ भाषेत लिहित असल्यामुळे त्यांचं लेखन कोणत्याही मराठी साक्षर माणसास कळते. स्वतः एक मोठे वाचक होते, म्हणून त्यांनी या प्रत्रात मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील इतर साहित्यिकांचा संदर्भ देत वेगवेगळ्या कविता सुभाषिते, दोहे आणि सुविचार यांचा उहापोह केला आहे. माझ्यासारख्या नवोदित लेखकांना तो एक खजिनाच आहे.
              लातूरमध्ये 2016 साली नंदी स्टॉपला हे पुस्तक फक्त 60 रु. त पुस्तक प्रदर्शनात सवलतीत मी विकत घेतलं होतं. अजब डिस्ट्रिब्युटर्सची बरीच पुस्तके ते प्रदर्शन मांडूनच नाममात्र दरात वाचकांसाठी उपलब्ध करून देतात,ही खूपच चांगली गोष्ट आहे. मग जरूर वाचा साने गुरुजींनी  लिहिलेलं "सुंदर पत्रे" हे पुस्तक.

©® विश्वेश्वर कबाडे (नवोदित बहुभाषिक कवी, लेखक), अणदूर

 ता. तुळजापूर 

जि. धाराशिव 

भ्रमणध्वनी- 9326807480

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू