पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेमाचा चहा

माझ्या मुलाचे वास्तव्य पुण्यात असल्याने, तिथे जाण्याचा आणि राहण्याचा योग वारंवार येत असतो आणि त्या मुळे तेथील राहणीमान, जीवनशैली अशा विविध गोष्टींचा अनुभव ही येतो. आयटी कंपनीने बाजारात युवा वर्गाला आवडणारे अन् आवश्यक अशा वस्तूंचा समावेश अधिक प्रमाणात दिसून येतो. पूणे शहर आपली खाद्य संस्कृती, इतिहास आणि आपल्या विशिष्ट अशा पाट्यांसाठी ही प्रसिद्ध आहे परंतु ह्या पाट्या मला फार आवडतात कारण मोजक्या शब्दात आपली इतरां कडून असलेल्या अपेक्षांचा अर्थ स्पष्ट असतो जसे "गाजर में सागर".

 

पुण्यात इतर वस्तूंचे सोबत चहा चे विभिन्न ब्रांड उदा. येवले चहा, जो की आता आपल्या इंदूर मध्ये ही उपलब्ध आहे. अमॄततूल्य चहा, त्यात प्रेमाचा चहा ह्या नावाने मी आकॄष्ठ झाले आणि चहात असे कोणते प्रेम लपलेले आहे ह्याची उत्सुकता मला जेष्ठ नागरिक असूनही जाणवली आणि मी मुला जवळ तशी इच्छा व्यक्त करतां त्याचे आश्चर्य मिश्रीत भाव मला सांगत होते की जणू ते तरुण तरुणींचे मिटिंग पाॅईंट असतात तिथे तू काय करणार? तरीही मी चहा मधील प्रेम हे जाणून घेण्यासाठी दुकानत शिरले.  

 

मी तेथील so called croud शी अपरिचित असल्याने आणि माझा मुलगा परिचित असल्याने तो संकोच करत होता आणि मी बिनधास्त. मी एका मध्य टेबलावर बसून प्रेमाचा चहा कसां? ह्याची ओढ लागली अन् स्वाभाविकच आहे नां कारण आता पर्यंत मी स्वतः चहा करायची तो काही पर्याय नाही म्हणून या नवर्याने रागावून अर्थात चहा एकच फक्त बनवणार्या चे पर्याय अलग अलग होते येवढे शच. 

वेटर आर्डर साठी येतां त्यानी विचारले मावशी, काय घेणार? . 

काय घेणार म्हणजे? चहाच्या दुकानात अजून काय घेणार? माझ्या चेहर्यावरील प्रश्न चिन्हाने त्याने प्रतिउत्तर दाखल त्याचे मेनू कार्ड माझ्या समोर ठेवले त्यात सुमारे चाळीस प्रकार च्या चहा आढळला आणि वेटर माझ्या समोर ' आम्ही पुणेकर कर' अशा स्वरूपात उभा होता. आले, विलायची, गवती चहा, मसाला, चाॅकलेट, अशा विविध चहाच्या प्रकारे चे अवलोकन करता़ गुळाचा चहा वाचताच मुलगा म्हणाला आई फार छान लागतो एकदा पिऊन तर बघ नक्की आवडेल.  

 

चहाचा पहिला घोट घेता क्षणीच मन सुमारे पन्नास वर्षे मागे गेले. त्या वेळेस चहाचे प्रमाण फारच कमी होते अन् आर्थिक स्थिती बेताची आणि सयुक्त परिवारात हे शक्य नव्हते आणि तसेही साखरेचा चहा पाहुण्यांना होत असे. इन्दोर च्या थंंडीत चुली वर सकाळी गुळाच्या चहा चा एक खमंग वास घरातील सर्वांना जागे करण्यासाठी पुरेसा होता. आम्ही सारी भावंडे स्वैपाक घरात पाया खाली तरट आणि अंगावर गोधडी पांघरून कपबशी मध्ये गुळाचा काळसर रंगाचा चहा अन् सोबत कुरकुरीत टोस्टचा आनंद घेत असू. अन् हो, जर कोणी अजून चहा मागितला तर वडील माणसे म्हणायची 'जास्त चहा नको पिऊ नाही तर त्याच्या सारखी काळी होशील मग तुझ्याशी कोण लग्न करेल', त्या काळात आयुष्यातील स्वप्ने फारच मर्यादित होती म्हणून ते शब्द स्वीकार्य होते परंतु तो युक्तिवाद आठवून आता हसू येतं. चहा चा रंग गुळाच्या गडत रंगानी बदलत होता,, साखरेचा चहा तर शुभ्र असायचा परंतु तो फरक समजण्यास आणि पटवून देण्या इतपत बुध्दी ही नव्हती न ही हिम्मत म्हणूनच अनेक गोष्टी भातुकलीच्या खेळा पर्यतंच मर्यादित राहिल्या असो. 

 

मला एकच गोष्टीचं समाधान व आनंद वाटतो की काही कां असेना आजचा युवा वर्ग जुन्या गोष्टींचा , रितींचा, खाद्य संस्कृतीचा तसाच जीवन शैलीचा नव्या रुपात कां होईना स्वीकार करत आहे. कालांतराने हा बदल त्यांचा साठी अन् भावी पिढी साठी लाभदायक ठरेल ह्या विश्वास आहे. 

जुन्या पिढीतील गवती चहा नवीन रुपात लेमन ग्रास टी म्हणून घ्या गुणधर्मात काय फरक पडणार. पटतंय ना? 

 

काय मावशी चहा भारी होताना? वेटरनी माझ्या अज्ञानाची तसेच आपल्या हुषारीची, नवीन अविष्काराची पावती घेऊन मला 'प्रेमाचा चहा' च्या कॅफे मधून सहर्ष निरोप दिला. 

 

तर मंडळी, जेव्हा ही कधी पुण्यात जाल तेव्हा प्रेमाचा चहा घेणं विसरू नका, घरच्या चहाचा ब्रांड बदलून जीवनात काही विशेष फरक पडत नाही रेड लेबल, बाघ बकरी, लिपटन असो वा ताज असे कोणीही म्हणत नाही त्या साठी हवा फक्त 'प्रेमाचा चहा'.

 

वाचक हो, तसेही 'पूणे तिथे काय उणे '

(कॄपया पूणेकर मंडळींनी वाईट वाटून घेऊ नये. हा फक्त नावाने झालेला विनोद आहे.). 

 

सौ. स्वाती दांडेकर

इंदूर

????9425348807

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू