पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अतिथी येता घरा

देवांच , गणपती बाप्पाचं स्वागत  आपण मनापासून करतो. अतिथी म्हणजे देवाच रूप ..त्यांच अगत्याने आणि आनंदाने ,हसतमुखाने दारात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे ही पण एक कलाच आहे असं म्हणावं.. सर्वांनाच ही कला अवगत असते असं मुळीच नाही पण ज्यांच्याकडे आपण जाणार त्या  घरच्या घरच्या गृहिणीने रेणुका शहाणेसारखी आपली बत्तीशी दाखवत जर स्वागत केलं तर आपलं पथकं हा भेदभाव न ठेवता तर येणाऱ्या  अतिथींचा प्रवासातला शीण तर निघून जातो पण आपली कुणीतरी दखल घेतली या गोष्टीचा मनापासून खूप आनंद होतो आणि येणाऱ्याच्या  अंतर्मन:पासूनमिळालेल्या  शुभेच्छांचा व आशीर्वादाची ती गृहिणी धनी होते…पण हे काम फक्त गृहिणीच नाही गृह राजांच सुद्धा असतं…

 

 मला माझ्या माहेरची गोष्ट आठवते.. माझ्या लग्नानंतर माझे मोठ्या भावाचं लग्न झालं आणि माझी भावजय अगत्याने स्वागत‌ करणारी होती.. रात्री बारा वाजता जरी कोणी पाहुणे दारात आले तर त्यांच्यासाठी ती आनंदाने स्वयंपाक करायची  आग्रहाणे जेऊ घालायची,त्यांना हवा नको ते बघायची.. कोणाचं काही दुखलं खुपलं तर विचारपूस करायची. त्यांच्या मिलनसार स्वभावाने अल्पावधीत ती आमच्या शेजारी पाजारी आणि सर्व नातेवाईकांमध्ये, माझ्या मित्रांच्या फॅमिली मध्ये लोकप्रिय झाली.. त्यामुळे माझ्या माहेरी पाहुणे येणाऱ्यांची संख्या वाढली.. कोणाच्याही अडचणीत मदत करायला नेहमीच तत्पर..  आज पण भाग पण करायला काही आनंदाने सगळं करायच्या…चेहऱ्यावर कधीही आधी पसरलेली बघितली  बघितली नाही मी…लहान पोर मंडळी मध्ये सगळ्यांचना प्रिय अशी भावजय मला लाभली त्यामुळे मला माहेरी कधी मी पाहुणी म्हणून आहे असं कधी वाटलंच नाही…. आणि अजूनही ते त्यांचं अगत्य कायम आहे…

 

  दुसरी एक आठवण म्हणजे, चाळीस वर्षांपूर्वी आम्ही दहा जण मुंबई चा टूर करायला निघालेलो.. .येता येता नुकतच लग्न झालेल्या पुण्यात राहणाऱ्या भावाच्या घरी भेट द्यायचं ठरलं…सकाळी सहा वाजता आम्ही त्याच्या घरी पोहोचलो.  माझा मोठा भाऊ भावजय, मी ,माझी एक चुलत बहीण, दूरचे मावशी ,काका त्यांचे दोन मुलं, अजून एक दूरचा एक नातेवाईक अठरा‌ विस वर्षाचा एक तरुण मुलगा, ज्याला  मुंबई बघण्याची खूप इच्छा होती.  नवीन संसार नविन भावजय.. स्वागत कसं होईल असा विचार करतच आम्ही सकाळी सहा वाजता त्यांच्याकडे पोहोचलो आणि आश्चर्याचा धक्काच बसला. माझी भावजय आंघोळ करून आरतीच ताट घेऊन हसतमुखाने दारात ऊभी.आमचा प्रवासाचा सगळा शीण कुठल्या कुठे पळाला.. अतिथींना कुठे ठेवू आणि कुठे नाही असं तिचं झाल होता… आत गेलं तर तेव्हा समोर देवा लावून होता तुझ्या आठवणी होती करत आश्चर्य वाटलं एवढं सकाळी उठून भावाचा डबा करून देऊन,देवपूजा करून ती हसतमुखाने आमच्या स्वागत करायला उभी होती आणि तिचं ते अगत्य कायम माझ्या मनावर कोरल्या गेलं…अजूनही तिचं व्यक्तिमत्त्व तसंच आहे कुठे गेली तरी बहार आणण्याचं..हवं हवंस  वाटणारं अस व्यक्तिमत्व.. अजूनही तसाच कायम आहे येणारा पाहुणा आला तर त्यांच हसून बोलून  स्वागत सगळे काम भराभर  रात्री बारा एक पर्यंत गप्पा मारायला तयार…

 

 आम्ही चौदा वर्षांपूर्वी अमेरिकेला मुलीकडे जायचं होतं पासपोर्टसाठी मुंबईला जावं लागायचं त्याकरता मी माझ्या अगदी हक्काच्या  बहीणीला  कॉल केला…

ती म्हणाली,                                          "अगं ऊद्दा न ह्यांच्या मित्रांच्या वडिलांची तेरवी आहे त्यामुळे आम्ही तिकडे राहणार घरी कोणीच रहाणार नाही…"

आम्ही पुणे ते मुंबई कॅब करून गेलो आणि सायंकाळी परत आलो..                              आमचे नवरोजी सांगतात…"आमच्या घरात राहायचे ते त्यामुळे त्यांच्याकडे आणि माझ्या सासऱ्यांचा अगत्य करण्याचा स्वभाव, त्यामुळे त्यांच्याकडे सतत पाहुण्यांची वर्दळ असायची.. त्याकाळी तो चुलीवरचा स्वयंपाक.. आधीच परिवार मोठा असायचा..                                              माझी आई नेहमी चुली जवळ बसूनच रहायची म्हणे.. एका पाहुण्याला टांग्यातून रवाना केलं की दुसरा  पाहुण्याचा टांगा दारात उभा राहायचा.. दूर दूर चे नातेवाईक आजूबाजूच्या गावात राहणारे  आमच्या घरी चार चार दिवस विनाकारण मुक्कामाला राहायचे.. आरामात गप्पा टप्पा खाणं आणि अगत्य असं असायचं की जाणारा दुसरे पाहुणे दारात उतरेपर्यंत जायचं नाव घ्यायचा नाहीआणि मग रात्री दिवसभर घराबाहेर होऊन हुंदडणाऱ्या  घरच्या मुलांना एका कोपऱ्यात कुठेतरी पोत्यावर झोपावं लागायचं .. त्यामुळे त्यांना पाहुणे आले की मनातून थोडा राग यायचा हो पावणे जाताना चार आणे हातावर ठेवायचे त्यामुळे पाहुण्या बद्दलचा राग कुठल्या कुठे पळून जायचा..         पण ही आठवण त्यांच्या मनात कायम घर   राहिली आणि आमच्या संसारात पाहुण्यांच आगमन फारसं होत नव्हत. आणि आम्ही पण पाहुणे म्हणून कोणाकडे  गेल्याचं  फारसं आठवत नाही.. माझं सासर गावातच असल्यामुळे कोणी पाहुणे आले की माझ्या मोठ्या दिरांकडे, नंदे कडे उतरायचे. आणि माहेरगावात असल्यामुळे सगळे येणारे माझ्या मोठ्या भावाकडे उतरायचे, त्याच्यामुळे "आमचा संसार हम दो हमारे  दो असाच" राहिला.. जेव्हा कोणी येते तेव्हा मी करते त्यांचं स्वागत.. पण फारसं पाहुण्यांचा आवत भगत मला करायला मिळाली नाही याची मला नेहमीच खंत वाटते..

 

माझ्या दोन्ही मुली अगदी रेणुका शहाण्यासारखा स्माईल करत येणाऱ्यांचं स्वागत करतात.. कधी गोष्ट निघाली तर मला म्हणतात.. तुझा उपदेश तुझ्याकडे राहू दे..                                    "तुला कधी पाहुण्यांच स्वागत करायच काम नाही पडला ना!"

 

 अतिथी देवो भव: म्हणून हसतमुखाने येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केलं पाहिजे.. त्यांच्या शुभेच्छा त्यांचे अंतकरणापासून मिळालेले आशीर्वाद हे सर्व आपल्या सदैव सोबत असते !

  

तुम्ही माझ्याकडे याल तेव्हा तुमचं अगदी दिलखुलासपणे स्वागत होईल याची खात्री बाळगा..

 

 " आम्ही तुमच्या घरी येऊ तेव्हा, चौफेर हसू उधळीत, आनंदाच्या फुलझड्या  लावून आमच्या स्वागताला  सामोरं  याल ना?"  

 

समाप्त …

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू