पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मधुराभक्ती

मधुराभक्ती*  (ललित)


ए,कान्हा नको लपून खोड्या...तुला माहीताय का....माझे नेत्र भलेही तुला बघत नसतील....पण माझ्या मनचक्षुंना ....अवघ्या जगात तू कुठेही लपलास तरी दिसतोस.....हो का....मग सांग बरं आता मी कुठाय.....तू sss तू ना माझ्या मागे लपलायस....अंहं....तस नाहीच मुळी....मग कसं....तू माझ्या पुढ्यात बसलीयस....राधे.....दोघंही खुप हसतात.....ए राधे बघ ना....तो चंद्रही कंदंबाच्या झाडामागे लपुन.... आपली

प्रेमबोली.... ऐकतोय....आणि त्याचा वर्ण रक्तिम होतोय....म्हणुन त्याचा तो दुग्धमय प्रकाश आज लालिमा लेऊन आलाय.... ....नको ना करुस प्रेम आराधन....नको ना बोलुस असले मधुर शब्द.....विरघळुन जाते ना मी.....त्या प्रेमशब्दाच्या गोडव्यात..

..मग विरघळू  दे की....त्यानंतर तू अजुन गोड दिसतेस....आज ना तू माळलेल्या फुलाचा मस्त सुगंध येतोय....घेऊ ना!....आहाहा...प्रत्येक गोष्ट  जशी मला विचारुनच करतोस....हो तर.... तू समोर नसलीस तरीही सुक्ष्मात येऊन विचारतो ना.....राधे जेव्हा दोन जीव .....प्रेमरज्जूने बांधले जातात ना....तेव्हा त्यांचे अंतर्विश्व.....मनाचं विश्व एकरुप होतं.....म्हणुनच बघ मला जेव्हाही तुला भेटावंस वाटतं ना .....मी फक्त बासुरीची मधुर तान छेडतो.... आणि ...आणि तू बाहेर पडतेस....बरोबर अगदी बरोबर.....अरे बासरी कानातुन मनात शिरते....आणि माझा माझ्यावरचा ताबा सुटतो.... मी जशी असेल तशी ....बासुरीच्या  आवाजाकडे खेचली जाते.... कान्हा खरच का असं होतं सांग ना.....अगं भोळी खुळीच कशी माझी राधा.....यालाच मधुराभक्ती म्हणतात.....राधे ही मनाची मनाशी सांधलेली वीण.....जिथे सत्य...निस्वार्थ...कपटविरहीत धाग्यांनी गुंफलेली असते ना तेव्हाच....असं सुंदर नातं निर्माण होतं....

      *दो जिस्म मगर एक जान है हम*

*एक दिल के दो अरमान है हम*

       कान्हा पुन्हा मधुर बासरी छेडतो आणि राधेशी....प्रेमगुज करतो....राधे बघ ना त्या कदंब वृक्षाने त्याचा फुलपाकळ्या....अंथरल्यात..तुझ्यासाठी....ए खरंच....राधा नाचते.....कान्हाच्या बांसुरीतुन सुर बाहेर पडतात...

    *मधुबन मे राधिका नाचे रे*


©️®️  स्वाती देशपांडे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू