पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेमवेडा

प्रेमवेडा


वेड आणि प्रेम एकदा

लागलं लपाछपी खेळायला

वेड्यावर आलं राज्य तो  १ २ ३

आकडे लागला म्हणायला ….



प्रेम बसलं झुडपात

लपलं गुलाबाच्या फुलात

वेड्याला प्रेम दिसलं नाही

काठी घेत मारली झुडपात ……


लागली काठी डोळ्याला

झालं प्रेम आंधळं

वेड्याला खुप वाईट वाटले

ते खुप खुप रडलं ….


आधार देत प्रेमाला म्हटले

माझ्या डोळ्याने तू बघशील

मी तुझ्या आधारासाठी

नेहमीच तुझ्या सोबत राहील ……


मग दोघांनी केली घट्ट मैत्री

बांधलं एकमेकांना वचनात

म्हणून प्रेम आहे आंधळं

प्रत्येक जण होतो वेडा प्रेमात  ……


          सुरेखा नंदरधने ✍️

    

      ????   ????   ????  ????  ????



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू