पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दिवाळी

                     दिवाळी


आनंदाची उधळण झाली 

दीप उजळले, आली दिवाळी ||धृ || 

पूजा करूनी गाय-वासराची 

साजरा करूया पहिला दिवस- वसुबारस 

पूजा करूनी धन्वंतरीची

साजरा करूया दुसरा दिवस - धनत्रयोदशी 

आनंदाची उधळण झाली 

दीप उजळले, आली दिवाळी ||1|| 

सत्याचा असत्यावर नेहमीच विजय

त्यासाठीच साजरा करूया तिसरा दिवस-नरकचतुर्दशी 

आपल्या सदनी नित्य राहावा सहवास लक्ष्मीचा 

त्यासाठी साजरा करूया चौथा दिवस - लक्ष्मीपूजनाचा 

आनंदाची उधळण झाली 

दीप उजळले, आली दिवाळी ||2||  

आपल्या आयुष्यी सदैव राहो गोडवा 

त्यासाठी साजरा करूया पाचवा दिवस - पाडवा 

भावा-बहिणीच्या प्रीतीचा 

साजरा करूया सहावा दिवस- भाऊबीजेचा 

आनंदाची उधळण झाली 

दीप उजळले,आली दिवाळी ||3|| 


©®- विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती,अणदूर

ता.तुळजापूर

जि.धाराशिव

भ्रमणध्वनी-9326807480


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू