पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आनंदाची उधळण झाली

आनंदाची उधळण झाली

दिप उजळले आली दिवाळी

आकाशकंदील लावले दारी                     विविधरंगी सजली रांगोळी.


पक्वान्नांनी सजली थाळी                             लाडू करंज्या शंकरपाळी

चिवडा चकल्या अन् कडबोळी

खाऊन तृप्त झाली बालमंडळी.


 उभे गंध रेखूनी कपाळी

 झब्बा धोतर टोपी सुंदर

 घालून कानी पहा भिकबाळी                     पुरुष सजले फासून अत्तर.


रेशीम लुगडे लेणे भरजरी

लेऊन सजल्या सुंदर ललना

आतिषबाजी अन् फुलझड्या

जणू उतरल्या तारका अंगणा.


रोज रोज शाळेत जाऊनी

बालगोपाळ होती कंटाळली

मग मातीचे बांधुनिया किल्ले

राजा राणींच्या काळात रमली.


सुसंस्काराच्या पेटवून पणत्या

प्रत्येकाच्या हृदयी मानवतेचा

दिवा लावू या स्नेहाचा

सण साजरा करू सौख्याचा.

     सौ ऐश्वर्या डगांवकर.

        इंदूर मध्यप्रदेश.

 मो .नं.-93297 36675













पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू