पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दिवाळी

आनंदाची उधळण झाली
दीप उजळले, आली दिवाळी ||ध्रु ||

संस्कृतीचे जतन करण्या
संबंध नात्याचे दृढही होण्या
पणतीची ती ज्योत उजळली
दीप उजळले, आली दिवाळी

दुष्ट प्रवृत्तीचा करूया तो वध
नरकासूर आठवून संमंध
दीपोत्सव दूर सारेल काजळी
दीप उजळले आली दिवाळी

मनी जागवू बळीची आठवण
श्रीकृष्णाला मनोभावे वंदून
कीर्तनी दंगता वाजे चिपळी
दीप उजळले आली दिवाळी

फराळ साहित्याचा चाखूया
फराळ सीमेवर पाठवूया
नजरांदाज ना करूया त्यांची होळी
साजरी होऊदे त्यांची दिवाळी

सुरू झाली गोड गुलाबी थंडी
बाजार उसळला, दूर झाली मंदी
स्वागता रेखूया दारी रांगोळी
दीप उजळले आली दिवाळी

 

जयश्री देशकुलकर्णी
कोथरूड, पुणे -38

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू