पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गंध वारीचा

गंध वारीचा....

गंध वारीचा भूवरी रचला,

होई आसमंती विलास,

सकलजनांची सेवा करा,

मना जागवा सज्जनास. 


कर जुळती त्याच्या पायी,

अवघे एक मागणे बाई,

सकलजनांची सेवा करा,

साकडे घाले विठ्ठल रकुमाई.


मना ठाव घेई भक्ती,

चाले पंढरीची वाट,

सकलजनांची सेवा करा,

मना श्रीहरीचा थाट. 


न जावे लागे वारीस,

माझा हरीच येई भोगास,

सकलजनांची सेवा करा,

येतो परोपकार खरा भेटीस. 


मना वाटो भूतदया,

हीच शक्ति विठुराया,

सकलजनांची सेवा करा,

पुण्याई येई पाठीराया.


लागे गोडी त्याच्या वारी,

कुणा नसे लोभाचे माप,

सकलजनांची सेवा करा,

सांगाती आहे मायबाप. 


सौ.  चंद्रलेखा धैर्यशील जगदाळे .

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू