पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आशा

 आशा 

 

दु:खी कशास होता आशा मनी करुया 

नाही म्हणावयाला आता असे करुया 

 

लढतात आज योद्धे सोडून पाश सारे 

काढून वेळ आपण त्यांना जरा स्मरुया 

 

झाकोळ होत गेला दाही दिशात जेंव्हा 

अंधार घालवाया हाती दिवा धरुया 

 

जगण्यातली मजा ही घेऊ आता जराशी  

पृथ्वी उशास घेऊ आकाश पांघरुया   

 

भेगाळल्या मनाला नसत्या उगाच चिंता  

शब्दास पेरुनिया मौनास नांगरुया 

 

साक्षात देव झाले त्यांना सदा नमूया 

देऊन साथ सा-या विश्वास सावरुया 

 

महेश कुलकर्णी {मदमस्त}

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू