पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

करोना

करोना


करोना करोना करोना

पुरेना देवा आता हा करोना

लाटेवर लाटा येती

जीवघेण्या बातम्या येती


जळत्या चिता जाळती आमच्या चित्ता

गरीब कामगार झाले बेरोजगार

बंद झाला महागाई भत्ता

पण चालू असे दारूचा गुत्ता

चालेना का देवा आता तुझी सत्ता? 


निरपराध बाळे झाली अनाथ

आया बहिणींची कूस झाली उजाड

काहींची हातची कांकण पिचली

का न देवा तुला त्यांची दया आली?


शिकविला मानवास चांगलाच धडा

मार्शलचा सिद्धांत कळला आम्हा

लोकसंख्या वाढली नि कमीही झाली. 

वृक्षतोड थांबवू, झाडे लावू

पाण्याचाही थेंब थेंब वाचवू

पण देवा नको रे अशी पाठ फिरवू! 


डॉक्टर, नर्स, सफाई कामगार झालास

त्यांच्या रूपाने मदतीला धावलास

पण मुळात या करोनाला 

भारतात प्रवेशच का दिलास? 


आता तरी देवा थांबव हे तांडव

येत नाही का रे तुझ्या लेकरांची कणव

आभाळातील बाबा आता हो जागा

गमावू नकोस विश्वास आमचा 

नाहीतर बसशील हात चोळत

भक्तांची वाट बघत


सौ. सुमन प्र. शृंगारपुरे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू