पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

षड्रात्रौत्सव

खंडोबाचे नवरात्र/षड्रात्रौत्सव


षड्ररात्रौत्सव हा खंडोबाचा

सुरु जाहला चला,

प्रतिपदाच ती आज आली

उत्सव करु भला!


चंपाषष्ठी येईपावेतो

आळवु खंडेरायाला

इडापिडा मम हरण करोनी

दे दे तू मज सौख्याला!


गर्जु सारे एकमुखाने

येळकोटयेळकोट जय मल्हार

अखिल खलांचा तू निर्दालक

करुया आता तव जयजयकार!


ताम्रकलशे स्थापुनी तुजला

नागवल्लीपर्णांनी सजवु

कुंकुमतिलक लाऊनी तुजला

प्रणाम मनोभावाने करु!


उपवास करुनी षड्दिन आता

भरीत-रोडगे नैवेद्य अर्पण करु

भंडारा तो उधळीत मग हो

प्रसन्नचित्ते कुळधर्म संपन्न करु!!


©️ डाॅ.श्रीकांत औटी

            नेवासा

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू