पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

असा ही एक बैठक सोहळा


( कथा पूर्णपणे काल्पनिक आहे काही साम्य आढळले तर योगायोग समजावा)

आटपाट नगरात आज एकच गडबड उडाली होती. कारण ते येणार होते अहो ते म्हणजे पाहुणे हो. आणि म्हणतात ना

पाहुणे येती घरा तोची एक सोहळा.  तश्या ह्या सोहळ्याची तयारी काही दिवसापासून सुरू झाली होती. राज्यातील दूरवर पसरलेल्या आपल्या वतनदार, जमीनदार, किल्लेदार इत्यादी मान्यवर ह्यांची एक बैठक झाली पाहिजे अशी एक नवीन कल्पना महाराजांनी मांडली होती. तशी ह्या लोकांची कामाची माहिती महाराजाना वेळोवेळी मिळत होती पण बरेच दिवसात प्रत्यक्ष भेट झाली नव्हती.


महाराजांनी प्रधानजी ना बैठकी बद्दल माहिती  दिली.प्रधानजी, आपल्या नवीन राजभवना मध्ये ही बैठक आयोजित करावी. येणाऱ्या सर्व लोकांची येण्या जाण्याची, राहण्याची व्यवस्था तुम्ही जातीने पहावी . आणि हो ह्या बैठकीमुळे आपल्या राजकोषावर काही विपरीत परिणाम होता कामा नये. पण बैठक मात्र भव्यदिव्य झाली पाहिजे. महाराजांनी फर्मान सोडले.

तसे प्रधानजी विचारात पडले, सोहळा भव्य दिव्य हवा आणि खर्च पण होता कामा नये हे कसे करावे. ह्या साठी खजिनदार आणि आपल्या काही विश्वासू लोकांना बोलाऊन बैठकीची कल्पंना दिली.

खजिनदार तुम्ही येणाऱ्या सर्व लोकांचं प्रवास नियोजन करावे. कोण रथाने येणार आहे, कुणाला घोडा, कुणाला हत्ती, कुणाला पालखी लागणार ते तुम्ही पाहावे. आणि राजकोशावर परिणाम नको.

खानिजदर काहीश्या नाराजीनेच बोलले, अहो प्रधानजी नुकताच महिना संपला आहे.राज्याचा जमाखर्च मांडणे, त्याचा हिशोब त्वरीत महाराजाना द्यायचा आहे.आता हे काम आधी करावे की प्रवास नियोजन करावे ,मला काही कळत नाही.

ते काही नाही हे काम आपणच करायचे आहे लागले तर तुम्ही कार्यालयातील नवीन होतकरू महिला प्रशासक ह्यांची मदत घ्यावी, त्यांना पण नवीन काहीतरी शिकायला मिळेल.
आणि तुम्ही स्वतः खजिनदार आहात, त्यामुळे राजकोषा वर विपरीत आणि अनाव्याशक भार न पडता कसे करायचे ते तुम्ही जाणताच काहीसे हसतच प्रधानजी बोलून निघून गेले.
खजिनदार आणि प्रशासक कामाला लागले.प्रथम त्यांनी राज्याचा नकाशा समोर मांडला. महाराजांची कीर्ती अन पराक्रम मोठा होता. त्यामुळे राज्य दूरवर पसरले होते. राज्याच्या कानकोपऱ्यांतून वतनदार,जमीनदार,किल्लेदार, भालदार, चोपदार इत्यादी मान्यवर ह्यांची एकत्र येण्याची तयारी  करणे म्हणजे एक दिव्यच होते. 
आता रथाने आले तर किती वेळ लागेल, घोडा आणि हत्ती ह्यांचा वेग किती असू शकेल, कोणी जवळचे पालखी करून आले तर कसे. अश्या बऱ्याच गोष्टींवर त्यांचा विचार झाला. आणि एक उत्तम आराखडा सादर
केला.कितीही म्हंटले तरी सुद्धा तिजोरीवर थोडातरी भार पडणार होताच. प्रधानजी नी महाराजांची अनुमती घेऊन पुढील कार्यवाही करण्यास हिरवा कंदील दिला.

प्रवासाची, राहण्याची ,भोजनाची काय व्यवस्था केली आहे त्याची पुर्ण माहिती  सर्व लोकांना दिवंडी देऊन दिली गेली. तरी सुद्धा काही जुने जाणते वतनदार ह्या व्यवस्थेवर नाखुश होते.काहीना रथ तर काहींना हत्ती हवे होते. पण ह्यात काहीच बदल होणार नाही असे प्रधानजी नी प्रेमाने पण दम देऊन सांगितले, त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला.

बैठकीचा दिवस ठरला तसे नगरात एकच आनंदाचे वातावरण झाले. एक प्रकारची घाई गडबड अन् लगबग सुरू झाली. सामान्य जनतेमध्ये ह्याची फारच चर्चा सुरू झाली. काहीतरी नवीन होणार असे सर्वांना वाटू लागले. आणि तो प्रत्यक्ष दिवस उजाडला सर्व पाहुणे मंडळी येईपर्यंत खजिनदार आणि प्रशासक ह्यांना झोपच नव्हती.  झोपेत सुद्धा प्रधानजी आदेश देतात की काय असे त्यांना वाटत होते.

सर्व लोकांनां पाहून महाराज प्रसन्न झाले. काही नवीन नियुक्त्या झाल्या होत्या त्यांना हा सोहळा म्हणजे एक नवीन अनुभव होता.काही जुने जाणते लोक आमच्या वेळी कश्या प्रकारे बैठकी होत होत्या ह्याचे उगाच रसभरीत वर्णन त्यांना करत होते.
बैठकीमध्ये काही मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले.काही जणांच्या कामाचे कौतुक केले गेले.

सरते शेवटी सर्वांना उदेशून महाराजांनी एक छोटेसे पण महत्वपूर्ण भाषण केले. आता आपल्या राजाच्या सीमा वाढवली पाहिजे. राज कोषामध्ये अधिक भर पडली पाहिजे.तरी आपला व्यापार सीमेपलीकडे वाढवावा लागेल. सेनापती तुम्ही तयारीला लागा तुम्हाला हवी ती मदत करण्यात येईल. साम दाम दंड भेद सर्व प्रकार अवलंबून राज्याची कीर्ती आणि प्रगती झाली पाहिजे.

नंतर सर्वजण सुग्रास भोजनाचा आस्वाद घेत महाराजांचा भाषणाचा अर्थ लावत होते. काही ना त्याचे काही सोयरे सुतक नव्हते ते आपले भोजनावर तुटून पडले होते.
भोजनानंतर सर्वांना राजभवन ची मोजकी सैर घडवून आणली.
दिवस जसा मावळती कडे गेला. तसे सर्व लोकानी आपल्या घरी प्रस्थान केले. प्रधानजी ,खजिनदार, प्रशासक एक सुटकेचा निःश्वास टाकत मावळत्या सूर्याला पाहत  राहिले.

हेमंत कदम
१५/१०/२०२३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू