पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मैत्रीचे धागे

मैत्रीचे धागे 


स्वतःशी कितीही चांगली मैत्री करा, 

पण काही वेळेला मैत्रीचे औषध;

असावे घरा घरात.

काळजाचे पाणी होते ज्याच्या,

आपल्या आधी सोसायला कळा,

असा एक मैत्र असावा सख्खा,

जे उभे आयुष्य नसतात सोबती,

कधीतरी तरी भेटतात videocall वरती,

तरीपण जपतात आपली प्रीती..

कधीही वेळे अभावी,

नाही असतो त्याचा अबोला,

पण जेव्हा भेटतो, तेव्हा 

मनमुराद सोहळा. 

नाही गरजेची असते भेटवस्तूची,

डोळे भरून असते चाहूल,

फक्त जुन्या आठवणीची..

ऋणानुबंध या जीवनाचे;

सोबतीला तुम्ही सारे,

अवती भवती जे आज आहे,

शाश्वत नाही कुठपर्यंत राहील,

तरीपण एक अढळ आहे, 

कुठलाही कागद,

त्याचा करू नाही शकत काडीमोड;

असे हे मैत्रीचे धागे म्हणजे,

जेवणात चव वाढवणार्‍या लोणच्याची फोड.



सौ. चंद्रलेखा धैर्यशील जगदाळे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू