पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्रीरेणुकामाता मोहटा

अंबाबाईने बोलावलं, तिनं घडवून आणलं, तिनं दर्शन घेण्याची, तिला मनोमन नमस्कार करण्याची संधी दिली.


दिवसांच्या चिमटीतून वेळ मिळाला. दोन दिवस हाताशी लाभले. आणि मोहटा, पाथर्डी येथील जगज्जननी श्रीरेणुकाम्बेचे दर्शन घडून आले.
सकाळी आठ वाजता प्रवास सुरू. दुपारी मोहटा येथे पोहोचलो. नुकतीच नवरात्र महोत्सवाची अश्विन शुद्ध एकादशीची जत्रा संपन्न झाली होती. सुट्टीच्या शिवायचे दिवस असल्याने गर्दी एरवीपेक्षा कमी होती. पहिल्या दिवशी दोन वेळेस आणि दुसरे दिवशी सकाळचे दर्शन घेता आले, ही परमदयालू अंबाबाईची कृपा होय.


गडावर अंबाबाईचे भव्य दिव्य मंदिर आहे. अंबाबाईचा गाभारा मोठा आणि उंच आहे. देवीने स्वर्णीम मुखवटा विशेषप्रसंगी परिधान केलेला असतो. मंदिरातील प्रदक्षिणा करताना देवीमातेच्या विविध रूपातील सुंदर मूर्ती आहेत. (श्री रेणुका मातेचे अष्टभैरव, ६४ योगिनी व दश महाविद्या यांच्या मूर्ती आहेत.)


संत श्री बन्सीबाबा दहिफळे यांच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवानपरशुरामजननी जगदंबा श्रीरेणुकामाता याठिकाणी प्रकटली. असे उल्लेख मिळतात. ही भूमी अनेक थोर तपस्वीजनांची तपोभूमी आहे.


देवीची आरती दिवसभरात तीन वेळा होते. पहाटे ५ वाजल्यापासून पूजेला आरंभ होतो. सकाळी ७ वा. पहिली आरती, दुपारी १२ वा. आणि सायं.७ वा. आरती केली जते. भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत मंदिर खुले असते.


शांत, प्रसन्न परिसर आहे. चारचाकी मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत जाते. पार्किंगची छान व्यवस्था आहे.


अनेक भाविक नवस बोलतात, मनोकामनापूर्ती झाल्यावर दर्शनाला येतात. गडाच्या पायथ्याशी भक्तनिवास आहे.


दुकानदार मंडळी सुद्धा चांगली आहेत. पूजा साहित्य घ्या, म्हणून कोणीही आग्रह करीत नाहीत.
भाविकांनी नेहमी यावे, असे स्थान आहे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू