पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्पस्ष्टत:

तोंडावर बोलणाऱ्या माणसाचं हे एक बर असत राव
जे आहे जीभेवर तेच असतात मनात भाव 

शब्द भलेही त्यांचे काट्या प्रमाणे रुततात 
मलमेचा मारा पण नंतर तेच येऊन करतात 

माहिती असत त्यांना पण कि आपण बोललेल लागेल समोरच्या च्या जिव्हारी 
पण उपचरचे डोस कडु च असतात त्याची हि असावी तयारी
 
मन करावं स्वच्छ ते ही अगदी धुतल्या तांदळा सारखं
मग नसावं अंतर कि कोण आपलं आणि कोण परकं

रुतलेला काटा हि अलगद काढण्याची असते त्यांची होतोटी
आणि त्यातही समोरच्याची निघते खरी खोटी

समजून घ्यावं तुम्हीही अशांना कि गुलाबाला हि काटे असतात 
पण त्यासारखी इतर फुलेहि प्रसिद्ध नसतात 

थोडक्यात यांची सर्वांमध्ये दहशतच असते तोडी
यांच्या समोर रंगवलेला चेहराही रंग सोडी 

औषध समजून घ्या हे स्वभावाचे मधापरी 
कारण अशीच लोक असतात तब्येतीसाठी बरी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू