पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सुवर्णमध्य दिवाळी

स्वच्छ करा हो धरणी सारी

आकाशाची वाणी ऐकली

आनंदाची उधळण झाली

दीप उजळले आली दिवाळी 

 

पूर्ण होऊ दे मनोकामना 

स्थिर रहावी रिद्धी सिद्धी 

लक्ष्मी नारायण कृपेमुळे

धनधान्याची होईल वृद्धी 

 

जरीही झाला नफा नी तोटा

लक्ष्मी नारायण हाती पेठ्या

आळवुनी मनोभावे प्रार्थना

भरेल पहा सुखशांतीचा कोटा

 

विसरू जावू जुना अबोला

अभ्यंगासम राहू या प्रेमाने 

क्षणभंगुर या जीवनातले

क्षण सुखी जगू सर्वार्थाने

 

सत्कर्माचा फराळ करुनी

दिवे लावुया मनःशांतीचे

गर्व ईर्ष्येच्या फटाक्यांना

मिटवणेच लक्षण सौख्याचे

 

न्याय सारखा दिला नभाने

दिन सूर्याचा,रात्र शशीची

साधू सुवर्ण मध्याची मज्जा 

प्रवाहासवे दर दिवाळीची

 

सौ.प्रज्ञा कुलकर्णी

#राज्ञी

वसमत जि.हिंगोली

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू