पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अव्यक्त भावना

अव्यक्त भावना 


वेळ ही सर्वच वेळी सारखी नसते,

प्रसंग ही वेगवेगळे असतात,

वेगवेगळ्या प्रसंगानुसार वेगवेगळ्या भावना या निर्माण होत असतात...


अनेकदा बोलत असताना चर्चा चालू असताना शांत बसण्याचा एक वेळ येत असते पण अशावेळीही न राहून शांत बसवलं जात नाही..


बऱ्याचदा अशी परिस्थिती निर्माण होते की खूप काही सांगावसं वाटतं पण कोणाला काहीच सांगावस वाटत नाही...,

आपल्याला बऱ्या वाटणाऱ्या भावना अनेकांना योग्य वाटत नाही, अन् अनेकांना योग्य वाटणाऱ्या भावना आपल्याला बऱ्या वाटत नाही...,


सुख दुःखाच्या कितीही सांगत बसलो भावना तरी ,त्या कधी पुऱ्या होत नाही...,

लिहायला वेळ असतो तेव्हा,काय? कस मांडव काही सुचत नाही...,

उचंबळून येतात भावना जेव्हा,शब्दात बांधल्या जात नाही...


सुचतंय मोडक्या ,तोडक्या शब्दात मत व्यक्त करण म्हणून आमच्या सारखे लगेच नवीन कवी होत नाही...,

एखाद्या कार्यक्रमाला त्याच्या झाली असेल मोजकी गर्दी म्हणून काय एखादा नेता लगेच भावी होत नाही,झालं तर त्याचच भल होत.नाही झालं तर कोणाला काही फरक पडत नाही...


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू