पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

करार तिचा कायदा माझा

गुंतायचे नाही हा करार तिचा होता....
करार मोडण्याचा कायदा माझा होता....

वाऱ्याच्या वेगाचा मला अंदाज नाही...
माझ्या शिडाचा भाता ताठ होता....

वेळ किती मोजली तिने भेटीची.....
तिचा क्षणाचा, माझा शतकाचा डाव होता...

सावरली बरेचदा ती स्वतःहून स्वतः.....
तरी सहऱ्यासाठी माझा हात होता.....

अन वेळ ती तिने नकळत गाठली केव्हा.....
तिचा हलका हात माझ्या हातावर होता.....

गुंतायचे नाही हा करार तिचा होता....
करार तोडण्याचा आता तिचा हट्ट होता....

आता एक घट्ट मिठी दोघात होती....
ती न सोडण्याचा नवा कायदा माझा होता....

                        - मीच तो 
                 ( अजिंक्य जाधव )

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू