पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

यशस्वी (ललित लेख)

 *यशस्वी*(ललित)

      

   यश,  मला आज भेटलं.म्हणालं,किती हुलकावण्या दिल्यात ना तुला,२०वर्षापासून माझ्या मागे लागली आहेस ना! मी तूला म्हणालो होतो  कि,सोप्या शाँर्टकट मार्गाने जाशील तर,मी अजून पुढेच असेन,सोप्प आणि सहजसाध्य असं माझं ठीकाणच नाहीयै.भल्याभल्यांना अर्धेअधिक आयूष्य गमवावं लागतं.आता हेच बघ ना,प्रभू रामचंद्राना आज होणारा राज्याभिषेक,१४ वर्षे वनवासानंतर झाला.

             भगीरथाला नाही का तीन पिढ्या तपश्चर्येत घालवाव्या लागल्या तेव्हा कुठे,गंगामाई पृथ्वीवर अवतरली.कुणाकुणाला म्हणून मी सुखासुखी भेटत नाही.गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना लहानपणापासून गायनाची आवड होती,वडील संगीत क्षेत्रातीलच होते,तरीपण सुरुवातीचे आयूष्य अतिशय खडतरपणे काढावे लागले,भरपूर रियाज करावा लागला.रियाज करायचा म्हणजे भल्या पहाटेच उठुन गाण्याचा सराव करायचा,तसेच खाण्यापिण्यावर भरपूर बंधन असतात,इतक्या मोठ्या त्यागानंतर यश मिळतं.हे यश मात्र खूप मोठ्या उंचीवर नेतं,आणि मग खाली पडायचं भयच नसतं.

                  साहित्याचे नोबेल,पारितोषिक मिळविणारे,गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनाही,त्यांच सुरुवातीचं लेखन जेव्हा स्थानिक  पत्रिकेत  छापलं जायचं,तेव्हा त्यांचेच जवळचे स्नेही त्यांची टवाळी करत असत.ते सगळा उपहास सहन करीत अनेक वर्षे सातत्याने लेखन करीत राहीले आणि नंतर त्यांना यश मिळालं.यशाच्या मार्गावर अनेक ढासळणार्या पायर्या ,मी जाणुन बुजुनच उभ्या  केलेल्या  असतात कारण मलाही बघायचं असतं ना,माणूस किती तयारीचा आहे ते.अनेकांना या मार्गावरुन पडायला होतं आणि काहीजण तर खचुनच जातात.अनेकवेळा खचल्यानंतरही जो पुन्हा उभा राहातो ना ,"अपयश ही यशाची पहीली पायरी असते" या न्यायानुसार मी त्याला पहील्या पायरीवरुन द्वितीय  पायरीवर प्रवेश देतो.अपयशाच्या घटना जेव्हढ्या जास्त ,यशही तेव्हढच जास्त जवळ यायला लागत.

         त्यानंतर यश प्राप्त करण्याच्या या मार्गावर तुला सामना करावा लागतो तो,तुझा हेवा ,मत्सर करणार्या तुझ्याच मित्र मैत्रीणींचा .वरकरणी आपलेपणा दाखविणारी ही आपलीच माणसं जेव्हा,तुझ्याच नसलेल्या चुका दाखवुन तुला कसं खाली खेचता येईल याचा प्रयत्न करतात, आपलाच हेवा करायला सिद्ध होतात , कधी ते यशस्वी होतातही . पण त्यांच्या विजयापासून आपणच धडा घ्यायचा आणि ,"पुढच्यास ठेच  मागचा शहाणा"या म्हणीप्रमाणे  मागची चुक सुधारुन स्वतःला  सिद्ध करायचं ,आणि समजायचं आपण द्वितीय पायरी यशस्वीपणे पार केलीय.

          आता आत्मविश्वासाने तृतीय पायरी चढायची.इथे तुला भेटतील प्रतीस्पर्धी तुझ्याशी स्पर्धा करणारे,तुझ्यापुढे त्यांना कसं जाता येईल ते बघणारे.तुला मिळालेली प्रत्येक संधी स्वतःकडे खेचून नेणारे,तू केलेल्या कार्याचे श्रेय स्वतःकडे घेणारे.तेव्हा सावध हो. त्यांच्याशी जराही मतभेद न दाखवता,सातत्याने ही कामे तुच केली आहेस हे कौशल्य तुझेच आहे हे सिद्ध करुन द्यायचं.

                 बस्स आता चढलीस चतुर्थ पायरी.आता मात्र तुझी स्वतःचीच परीक्षा असते.या यशाने हुरळुन गेलीस तर मात्र ,त्या सापशिडीच्या सापासारखी खाली येशील.प्रथमतः स्वतःचा अहंकार  वाढणार नाही याची दक्षता घे.कारण अहंकारापोटी आपल्याच हातून गैरकृत्य घडण्याची  शक्यता असते.तेव्हा आपल्या मनोदेवतेला स्मरुन मला यशाची नशा चढू  नये म्हणून प्रार्थना  कर.आपणही खालच्या पायरीवरून वर आलो  आहोत याचं कायम स्मरण ठेव.त्यानंतर चढायची  पाचवी पायरी

           आता तू पोहोचलीस यशाच्या  सर्वोच्च शिखरावर. आता विनय,नम्रता हेच तूझे अलंकार  असतील,हे लक्षात ठेव,प्रत्येक कार्यात भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ह्या न्यायानेच वाग.

    *यशाच्या  उत्तूंग शिखरावर तूझं स्वागत*

            *यशस्वी भवः*

    स्वाती देशपांडे .नागपुर .


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू