पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संक्रांत

            संक्रात (संस्मरण)


संक्रात म्हटलं की मला माझ्या सासूबाईंनी सांगितलेला एक प्रसंग आठवतो. दर संक्रांतिला

त्या गुप्त वाण ठेवायच्या .गुप्त वाण म्हणजे असं की त्या दिवशी सकाळी प्रथम जी कुणी सवाष्ण बाई  येईल तिला त्या ते वाण द्यायच्या .ते वाण म्हणजे एक नवीन लुगडं असायचं त्याचबरोबर त्या स्वतःसाठी पण लुगडं ठेवायच्या दोन लुगडे पाटावर ठेवले जायचे.जी सवाष्ण येईल तिला जे आवडेल ते तिने घ्यायचं.आमच्या घरी सोवळं-ओवळं फार असल्याने पूजेला एक गुरूजी यायचे .घरात वाणासंबंधी चाललेली चर्चा ऐकायचे.सासूबाईंसाठी घेतलेल लुगडं थोडं महाग असायचं त्याचा रंग वगैरे सर्वच चर्चा चालायची.संक्रातिच्या दिवशी अगदी सकाळी सकाळी दरवर्षी त्या गुरूजींची बायकोच घरी यायची आणि नेमकं सासूबाईंसाठी ठेवलेलं लुगडच निवडून घेऊन जायची .चार पांच वर्षं असं झालं. मग मुलांना वाटलं की काहीतरी गडबड आहे.त्यांनी सासूबाईंना न सांगता त्या गुरूजीसमोर जे वाणासाठी घेतलेलं लुगडं होतं ते लुगडं सासू- बाईंच आहे आणि त्याचा रंग वगैरे सर्व उल्लेख केला.संक्रातिला नेहमीप्रमाणे गुरूजींची बायको आली आणि तिनं तेच लुगडं घेतलं जे मुलांनी आदल्या दिवशी सासूबाईंचं आहे असं वर्णन केल होतं.खरतर सासूबाईंना या गोष्टींच काहीच वाटत नसायचं .त्या तर याच खुशीत असायच्या की फार नाही तर एखादं लुगडं सवाष्णीला दान दिल जातं.कारण त्या काळात आमचीही परिस्थिती काही खूप चांगली नव्हती.

       मुलांना हे सर्व करताना मजा आली.परंतु जेव्हा हे सासूबाईंना कळल तर त्या खूप नाराज झाल्या.त्यांच्या मनाला खूप चुटपुट लागली.त्या खूप रागावल्या.पुढच्या संक्रातीच्या वेळी त्यांनी 

मुलांपासून दोन्ही लुगड्यामधील त्यांचं लुगडं कुठलं आहे हे गुप्त ठेवलं.कारण दान हे तर एका हाताचं दूस-या हाताला पण कळल नाही पाहिजे.

        सौ ऐश्वर्या डगांवकर.इंदूर.


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू