पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

येऊदे रामराज्य घरोघरी

येऊदे रामराज्य घरोघरी


सण उमजून करा साजरा, 

बांधा आनंदाचे तोरण,

दीपमाळ लावा दारी,

येऊदे रामराज्य घरोघरी. 


लक्ष लक्ष दीप जोडती,

नावीन्याची उधळण,

भक्तीची कास बांधुन पदरी,

येऊदे रामराज्य घरोघरी. 


थोरा मोठ्यांनी खूप सांगिले 

गूढ ऐकले रामायण,

आज अवघा आसमंत पुकारी,

येऊदे रामराज्य घरोघरी. 


दूर व्हावा अंधकार,

स्फूर्ती असो परोपकार;

संचारी रावणाचा आला संघारी

येऊदे रामराज्य घरोघरी.  


पुन्हा पुन्हा हे भाग्य मिळावे,

प्रभू चरणांवर मस्तक टेकावे;

रोज तुझ्या भेटीला 

बोरे गोळा करते शबरी 

येऊदे रामराज्य घरोघरी. 



जय श्री राम 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू