पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आमुचा तिरंगा अभिमान

वीर देशाचे पुत्र आम्ही....
भारत ज्याचे नाव...
देशाने दिले जे मूल्य ...
समता बंधु भाव....
देशासाठी आमुच्या...
आमुचे सर्वस्व कुर्बान....
ह्या मातीचा जन्म अमुचा...
लढण्या सदैव तैयार...
तिरंगा आमुची शान....
अमुचा तिरंगा अभिमान.....

गौरवशाली इतिहास अमुचा....
जगास देतो विज्ञानाचे धडे....
संस्कार मोठे विचारांचे....
जागजेत्ती क्रांती घडे.....
संतांची भुमी देई प्रेरणा ....
शांतीचा मार्ग,बुद्धाची करुणा...
वाढे जगात अमुचा मान...
तिरंगा आमुची शान....
अमुचा तिरंगा अभिमान.....

वाहती धरा, गाती नद्या....
छाती ठोकून उभा, पहाड अभिमान....
चरण धुता मातृभूमीचे....
समुद्राला गर्व महान....
बहरती फुले, झाडे गाती....
देशाचे गीत एक साथ गाणं....
तिरंगा आमुची शान....
अमुचा तिरंगा अभिमान.....

सीमेवरती वीर उभे....
जवान आमुचे नायक जे...
शेतात ज्याच्या अन्न पिके....
किसान दाता नायक जे...
भाग्यशाली आम्ही वंश ज्यांचे....
राष्ट्रपिता आमुचे जननायक जे....
तिरंगा आमुची शान....
अमुचा तिरंगा अभिमान.....

हिमालय गरजे जोशाने...
जय भारत मा चा नारा....
जगास देई दिशा अमुचा भारत देशा....
विजयी शौर्य साहस आमुचे ....
एक लहू, एक धर्म,मजहब एक अमुचा ....
आम्ही हिंदुस्तानी... हिंदोस्ता आमुचा ...
हा देश आमुचा प्राण...
तिरंगा आमुची शान....
अमुचा तिरंगा अभिमान.....
                                  - मीच तो
                                (अजिंक्य जाधव )

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू