पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

राष्ट्र हा माझा

राष्ट्र हा माझा
श्वासोच्छ्वास आमचा

तुझ्या चरणी करितो नमन
तव रक्षणार्थ सदैव तत्पर
देशी विदेशी तुझीच किर्ती
आमचे गणतंत्र असे
अबाधित या जगी
जन्मोजन्मी गावी तुझीच
यशगाधा
हे भाग्य लाभले आम्हाला

प्रगतशील राष्ट्र आमचा
उन्नत पथावर अग्रगण्य
किर्ती त्याची पसरली जगत्रयी
भूमातेला करूनी वंदन
तिरंगा आमचा फडकला
थेट चंद्रावर

तव रक्षणार्थ सदैव तत्पर
असोत हीम श्रॄंखला वा
असो नीर सागराचे
विश्व विजयी राष्ट्र आमुचे
तिरंगी ध्वजाची वीरगाथा
रक्षील आमची जल, जल, नभ सेना
क्षण आला भाग्याचा
करु अमॄत महोत्सव साजरा
हा गणतंत्र दिनाचा
नमन करते मातॄभूमीला
जन्मोजन्मी तुझ्याच कुशीत यावे
हीच आस माझ्या मनाला

सौ. स्वाती दांडेकर
इंदूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू