पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ज्वर

बघ असा व्याकुळ मी...
अन तुझा गोडवा किती....
तहाणलेला किती देह माझा...
तू पाजलेस मजला पाणी किती....

कपाळावरी हात माझ्या तुझा....
तपासशील खरे मला किती...
ज्वर फार आहे देही....
तुझ्या प्रेमाचा पारा किती.....

आता उठू नकोस इथून...
सोडण्या आतुर तू किती....
घे बिलगून मिठीत मजला...
पाहू खोल मिठी किती....

देहाचा भरलेला काठ तुझा...
मी देहावर भाळू किती....
नागमोडी वळणे सारी तुझी...
वेड्या मनाला थांबवू किती...

हि भाषा देहाची अशी....
मनी माझ्या रूप तुझे किती....
मनाच्या गाभाऱ्यात तू सखे....
देवी सम पुजू किती....

तूच दवा वैद्य माझी....
हट्ट मी करू किती....
चुंबून बघ ओठांना खोल...
शहारा सांगेल माझे प्रेम किती...
                                          - -मीच तो 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू