पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चहा

पुण्यात फिरत असताना आम्हा दोघांना नेहमी एक फलक जागोजागी दिसायचे.

' अमृततुल्य चहा '.वाचून नेहमी हसू यायचं.पुणेरी लोक कशाला काय नाव देतील काही सांगता येणार नाही.नेहमीच ते वाचून आम्ही दुर्लक्ष करायचो.

एकदा असंच फिरायला लक्ष्मी रोडला गेलो.साहजिकच तुळशीबागेत जाण्याचा मोह काही टाळता आला नाही.त्या दिवशी नेमका उपास होता . फिरून फिरून दमलो होतो.त्यातून दोघांनाही मधुमेह असल्याने चांगलाच थकवा जाणवत होता.उपासामुळे बाहेरचं काही खाऊ शकत नव्हतो.कारण बाहेर सर्व पदार्थ तेलात असतात ते पण चालण्यासारखे नव्हते.अचानक हळूहळू मला चक्कर आल्यासारखं वाटलं.पण मी दुर्लक्ष केलं .आम्ही खरेदी करुन तिथून बाहेर पडलो आणि मी मात्र मटकन खाली बसले.हे एकदम घाबरले."तरी मी तुला सांगत होतो उपास वगैरे करत जाऊ नको."ह्यांनी मला पाणी दिलं पण काही फायदा नव्हता कारण साखरेचं प्रमाण कमी झालं होतं.मला दरदरून घाम फुटला होता.अचानक ह्यांच समोर लक्ष गेलं आणि इतके दिवस दुर्लक्ष करायचो आणि हसायचो तो 'अमृततुल्य चहाच '

कामाला आला चांगला दोन कप चहा प्यायल्यावर मला तरी आली.अखेर त्या 'अमृततुल्य' चहानेच माझ्यासाठी संजीवनी चं काम केलं होतं.आणि मग 'अमृततुल्य'चा खरा अर्थ लक्षात आला.

       सौ ऐश्वर्या डगांवकर.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू