पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वेटर

गुलाबी थंडी होता सुरू

जुनी लोखंडी पेटी खुदकन हसली

उघड नां आठवणींचा पिटारा

स्नेह स्पर्श अनुभव नां जरां

 

आठवणींचा उघडता पिटारा

सुख दु:खाच्या येती लाटा

आनंदाश्रूंनी नेत्र पाणावती

तर दु:खाश्रूंनी नेत्र भिंजती

 

अनुभवांच्या सुखद आठवणी

प्रेमाच्या स्पर्शाने सुखावती

आई, आजी मिळुली मनाचा, 

भावनांचा ताबा घेती

 

क्षणभरात जीवनपट सामोरी येतो

पुन्हा बाल्यावस्थेत घेऊन जातो

सुखद क्षण वात्सल्याचा

आधार तो जीवनाचा

एक एक धागा प्रेमाचा

विविध रंग जीवनाचे

गुंफून विणले घट्ट धागे स्नेहाचे

 

पिटार्या मधुनी निघाले जुने

स्वेटर, टोपी, मोजे, मफलर 

जे विणले होते आप्त स्वकीयांने

स्नेह स्पर्शाने पुलकित झाले

तो स्पर्श अनुभवला नव्याने

 

नवीन वाट गवसली मजला

नातवा साठी लोकर शोधू लागले

स्नेह बंध जीवनाचे

असेच गुंफावे

आपल्या आठवणींचे पेटारे

भावी पिढीचा वारसा म्हणून जपावे

 

सौ. स्वाती दांडेकर

9425348807

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू