पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्री स्वामी समर्थ, प्रचिती, एक अनुभव

श्री स्वामी समर्थ. प्रचिती
एक अनुभव ????


श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
स्वामीचीं मनापसून भक्ती करणाऱ्या प्रत्येकाला ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रचिती देत असतात.


कुणाच्या ना कुणाच्या मानव रूपात ते आपल्याला त्यांचा प्रत्यय /साक्षात्कार मदतीला येऊन दाखवीत असतात.
प्रत्येक स्वामी भक्ताला छोटयात छोटया गोष्टीतुन प्रत्यक्ष अनुभव नक्कीच आला असावा असं मला तरी स्वानुभवातून वाटते.
ते कुणाला तरी मदतीला पाठवून आपणांस सहकार्य करीत असतात.
मला ही स्वामीना खूप चांगला अनुभव आहे.
मी स्वामीचं नाव मनात घेताच त्याच्या मानवी रूपातून माझं अवखड वाटणार कार्य ही सोपं होऊन जात. आणि ते पूर्ण ही होतं.
असे मला बरेच अनुभव आलेत.


त्यापैकी .
एक अनुभव कोविड 2021 च्या काळातला मला आलेला. तो असा
मी माझ्या बायकोच्या मैत्रिणीच्या आश्विनी सलगर राहणार, अक्कलकोट.हिच्या  साखरपुड्या च्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. मी, माझी बायको वृषाली, तिचे मित्र अभिषेक, रोहिणी, स्मिता व सोबत विलोक असे 5 जण एकत्र गेलो होतो.
2020 कोविड ची सुरुवात होत होती. भारतात 3-4 पेशंट होते बहुतेक.

खूप अफवा पसरवल्या जात होत्या. सगळीकडे खूप नियम /बंधने होती. अशातच आम्ही निवडक 50  लोकांना त्यानीं आमंत्रण दिले होते. लग्नाला  नतंर विलोकच्या स्कूल मुळे शक्य नव्हते म्हणून आम्ही गेलो होतो. आणि मला तिच्या कार्यक्रमा सोबत अक्कलकोट मध्ये स्वामी दर्शनही घ्यायला जायचे होते.
आम्ही सर्वजण ट्रेन ने मास्क, सनिटायझर, सर्व सोबत घेऊन काळजी घेत पोहोचलो होतो. आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि अर्ध्या तासानतंर कळाले की त्यांनी साखरपुडा कार्यक्रमाचा हॉल अचानक बंद करण्यासाठी पोलीस स्टेशन मधूनफोन आला. बिचारे तिच्या घरचे आणि तिच्या सासरचे सगळेच गोंधळात पडले. अचानक कसे करणार कार्यक्रम.
पण मुलाने नवरदेव अमोल ने त्याच्या कुटुंबातील सर्वांना सोबत घेऊन त्यांच्या घराच्या टेरेस वर सर्व अरेंजमेंट आदल्या दिवशीच करायचं ठरवलं आणि तसेच केलं देखील.
घरात सर्व आनंदी वातावरण थोडं चिंतेत निर्माण झालं होतं. साखरपुडा व्यवस्थित पार पाडणे हे आता सर्वांचे लक्ष होते.
तशी दोन्ही घरच्या लोकांनी जमेल तशी तयारी केली. दुसऱ्या दिवशीच 4. वा कार्यक्रम करायचा असं ठरलं होतं. आम्हीही सकाळी लवकर उठून स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला जाणार होतो. मंदिर बंद करण्याचे ही शासनाचे नियम सुरु झाले होते. सॅनिटायझर व मास्क लावून, अनोळखी व्यक्ती पासून अंतर ठेवुन कुठेही स्पर्श न जायचं होतं.
आम्ही सगळे तसेच सकाळी दर्शनाला गेलो, कुणीच मंदिरात येतं नव्हते. मोजकेच लोकं व पोलीस,मंदिर परिसरात होते. आम्ही शांत. स्वामीचं दर्शन घेऊन. पुन्हा साखरपुडा आहे तिथे नवरा मुलगा अमोल च्या घरी गेलो. 40-50 लोकांना परवानगी मिळाली होती. त्यांचे 25 आणि मुलीकडचे 25 असे. वातावरण थोडं आता संगीतमय झालं होतं. छान, टापटीप सोय केली होती.
आम्हाला कार्यक्रम सपंवून पुन्हा माझ्या आईच्या गावी मोहोळ यावली ला उजेडात जायचं होतं. नतंर गाड्या मिळत नसल्याने आम्हला ती खूप मोठी काळजी वाटत होती. म्हणून मी वृषाली, विलोक ला लवकर निघायचं व बसने जायचं ठरवलं होतं.
साखरपुडा कार्यक्रम व नतंर जेवण, फोटोशेषण सर्व होईपर्यंत रात्रीचे 6.30 वाजले . कळालेच नाही.
मला माझ्या छोटया विलोक, व वृषाली ला रात्रीचे घेऊन जाणे जोखमीचे होते.
मनातल्या मनात मी स्वामीना प्रार्थना केली आम्हाला स्वामी सुखरूप आमच्या गावी जायला मदत करा.


मी या विचाराने टेन्शन मध्येच होतो.
अशावेळी अश्विनी आणि यांचा ऑफिस मधील सिनियर (बॉस ) कैलाश परमार मुंबईहुन स्वतः कार ने एकटेच आले हे समजले. आणि स्वामीनीं माझी अडचणीत मदतीला त्यांना पाठवले असेच मला जाणवले. कार्यक्रम आटोपता होता होता काळोख झालेला. कैलाश सर यांनी आमच्या साठी काही सेकदात तयारी दर्शवून अभिषेक, रोहिणी, स्मिता सोबत आम्हाला ही गाडीत ऍडजेस्ट करून थेट आमच्या गावच्या " यावली " मोहोळ च्या वेशीपर्यंत सुखरूप आणून सोडले.
रात्री चे 9.30 वाजले होते. आमच्या गावी रोडजवळ रात्री चोर दबा धरून लुटतात हे ऐकून होतो.
श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण केले की
" अशक्य ही शक्य करतील स्वामी "
या गोष्टीचा प्रत्यय येतों.
स्वामी प्रत्येकाला संकटात त्यांचे मनोभावे नामजप केल्याने कोणत्याही रूपात येऊन मदत करतात. याही वेळी आम्हाला स्वामीनी कैलाश सर यांना देवदूतसारखे मदतीला पाठवून सहकार्य केले.
घरी रात्री उशिरा पोहोचल्यावर आम्ही शांत, स्वामीचे नाम घेऊन त्यांचे आभार मानून झोपी गेलो.

स्वामी नाम नित्य जपू या
व निःस्वार्थ सेवा कार्य करीत राहू या
" श्री स्वामी समर्थ "
जय जय स्वामी समर्थ  ????


धन्यवाद.
आपला
एक स्वामीभक्त
लव गणपत क्षीरसागर
मोबाईल  : 9867700094

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू