पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निरोप

       निरोप   

निरोप कसला देता मजला

अनादी अनंत काळापासून 

नित्य माझे येणे जाणे 

उगाच का जाता  विसरून  

                                                                 काय सरले काय उरले

आता कशाला आठवायचे

नव्या वर्षाचा नवा भास्कर

क्षितीजावर उगवताना पहायचे

 

निरोप कुणा-कुणाला कसा द्यायचा?

सुहृदांच्या प्रेमाला वा शत्रूच्या शत्रूत्वाला 

आनंदाच्या क्षणांना वा दु:खद घटनांना

नव्या जुळल्या नात्याला

का सोडून गेलेल्या जिवलगांना...

 

झाल गेलं विसरून जायचं

पुन्हा नव्याने सुरुवात करणे

सोपं असतं का हो इतुके

जीवनाच्या फळ्यावर नव्याने                  नित्यनवे धडे गिरवणे.

 

' त्या 'च्या कडे जात असता

निरोप घ्यावा फक्त जीवनाचा 

निरोप घ्यावा अंगी वसणा-या

फक्त मोहमायादि षड्रिपूंचा.

      सौ ऐश्वर्या डगांवकर. इंदूर

        मध्यप्रदेश

      भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू