पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वागत

रात्री पाठी दिवस येतो

पाठशीवणीचा खेळ

नववर्षाचे स्वागत करूया

 जुन्या नव्याचा  घालून मेळ

 

  आरोग्याचा ध्यास धरूनी

 योगा, प्राणायाम  करूया

नकारात्मकता सोडून मनीची

सकारात्मकतेची आस धरू या

 

 आला क्षण गेला क्षण

आभार माना त्याचे मनोमन

सरत्या वर्षाला निरोप द्यावया 

आनंदित  ठेवा आपुले तन मन

 

 जीवनातील वर्ष एक सरले

जणू माळेतील निसटला मोती

 जगण्याचा आनंद लुटूया

घेऊन मित्र मैत्रिणीच्या भेटी

 

ज्योती

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू