पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मला भावलेले पुस्तकं सोबतीन

     गेल्या वर्षीची गोष्ट आहे. माझ्या वाचनात एक सुंदर कथासंग्रह आला. त्या कथासंग्रहाचे नाव आहे “सोबतीन.” लेखक प्रमोद कोयंडे. 
   सोबतीन हा तसा म्हटलं तर मालवणी शब्द आणि मी मुळात मालवणी असल्या कारणाने मला या कथासंग्रहाच्या नावाने फार आकर्षित केले. सोबतीनचा मराठी अर्थ सोबत असणारी किंवा साथ देणारी.
       पुस्तकाच्या प्रस्तावनेतच लक्षात येते की, कथा ह्या कोकणाभोवती फिरतात. आपलं कोकण असं अनुभवायला मिळणार हा आनंद वेगळा होता. हळू हळू पुस्तक वाचायला सुरुवात केली, खर तर वाचुन पुस्तक पुर्ण करायला बराच उशीर झाला. "देवचार" कथेपर्यंत पर्यंत पटापट पुस्तक पुर्ण केले पण मग काही कामाची गडबड, घरातले कार्यक्रम यामध्ये बाकीच्या गोष्टी वाचायच्या राहून गेल्या. पण जसं पुस्तक पुर्ण होत होत, तसे प्रत्येक पात्र माझ्या मनात त्यांचं एक घर बनवत होतं.कोयंडे सरांनी खूप छान आणि सुंदर लिखाण केले आहे. त्यात कोकण दिसतेच पण आपली मालवणी संस्कृती फार ठळकपणाने जाणवते आणि त्याचा अभिमान हि वाटतोय. मुळात मी कोकणातला असल्यामुळे त्या पात्रांना, त्या वातावरणाला मी खूप जवळून साठवत जातं होतो. सोबतीण, होळी, देवचार, चीत्त्या या गोष्टींमधून अगदी ऐंशी नव्वदीचे कोकण डोळ्यासमोर उभे राहतो. जे मी माझ्या जुन्या जाणत्या लोकांकडुन ऐकलेले आणि थोडेफार अनुभवलेले . त्यामुळे काही कथा वाचताना मी माझ्या लहानपणीच्या काही आठवणीत रममाण ही होत होतो. 
   मास्तर कथेतील नायक मला जंजीर फिल्म मधला विजय वाटू लागतो. जो एक ऊर्जा घेऊन वावरतो आणि नकळत एक सामान्य माणूस आपल्यासाठी सुपर हिरो वाटतो. "सुर्या "ज्या पद्धतीने गेला ते मनाला लागते. त्यातही तो मला काला मधला रजनीकांत वाटला. या घटना आपल्या आजूबाजूला आजही घडत असतात त्याचे परिणाम हि दिसत असतात. पण ज्या पद्धतीने प्रमोद कोयंडे सरांनी ते मांडले आहे ते कमाल आहे.
    मला लिखाणाची पद्धत आणि पकड कमाल वाटली. बाकी नापास, वीस रुपये, भीक्या आणि अण्णांचा पुनर्जन्म या कथा आपल्या आयुष्यातील अनपेक्षितता दर्शवितात अशा प्रसंगांना किंवा परिस्थितीला आपण तयार नसतो. मला वाचक म्हणुन तरीही होळी आणि सोबतीण या दोन गोष्टींनी या कथासंग्रहाचा संपुर्ण ताबा घेतला आहे असे जाणवते. पुढे आपण पुस्तक वाचून संपवतो. पण पुस्तक वाचताना किंवा वाचून झाल्यावर सुध्दा या दोन कथा गडदपणे मेंदूत कोरून राहतात. हां माझा अनुभव. सोबतीण मधले जुने वाडा, गिर्ये, विजयदुर्ग या गावांचे वर्णन मनाला खूप भावले . खूप सुंदर आणि लेखक सरांना धन्यवाद इतक्या सुंदर कथांचा आस्वाद घेऊ दिलात त्या बद्दल.
     प्रत्येकाने एकदा तरी जरूर वाचवा असा कथासंग्रह आहे. डिंपल प्रकाशन आणि प्रमोद कोयंडे लिखित कथासंग्रह " सोबतीन " अमेझॉनवर उपलब्ध आहे.
                                                      - मीच तो
                                                      (अजिंक्य जाधव )

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू