पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेमांकुर

'किधर है अंक्या? साल्या आज कसली मॅच झाली शिवाजी पार्कला! तू हवा होतास यार. खूप दिवसांनी इतकी भारी मॅच झाली, एकदम क्लोस फिनिश! लास्ट ओव्हरला सात डिफेन्ड करताना फट्टे बॉलिंग करून रव्यानी काढली मॅच. कडक एकदम.'

'आयला मी नसताना बरोबर भारी मॅच झाली नाही का सम्या! साला गेले रे आता हवं तेव्हा शिवाजी पार्कला येऊन मॅच खेळायचे दिवस. आता काय मार्केटिंगचं दप्तर लावलं पाठीवर आणि निघा कधी इकडे तर कधी तिकडे!'

'ए शहाण्या, बोलतो तर असा आहे जसं जाऊन जाऊन विकतो सामान तू, सेल्स बॉय सारखा. एम.बी.ए. करून रिजनल सेल्स मॅनेजर झाला आहेस. विमानानं फिरतो. कमीत कमी ए.सी.टू टायर नी प्रवास असतो तुझा, ते पण जेव्हा विमानतळ नाही किंवा विमानानं शक्य नाही. मार्केटिंगचं दप्तर म्हणे, ब्रिफकेस आहे ती ब्रिफकेस!'

'हा हा हा, अरे पण तू मॅचचं बोललास तर खरंच वाटलं, फुकट मोठे झालो भें... कधी आता पार्कात सिक्स मारणार पुन्हा? आणि त्या सोबत चालणाऱ्या सहा मॅच पैकी आपला बॉल शोधण्यात जी मजा आहे, आता पुन्हा कधी येईल माहिती नाही रे!'

'तू ये परत. नाही पार्कात तर बॉक्स क्रिकेट तरी खेळूच एखाद्या रविवारी! मिळेल का भाई आम्हांला अपॉइंटमेंट? ह्या ह्या ह्या!'

'ए सम्या चु... काही पण काय! साला तुमच्यासाठी वेळ नाही काढणार का मी!'

'ए सेंटी, गम्मत केली रे! आता हळूहळू सगळ्यांचं हे होणार. लाईफ इस सच! आला की भेट नक्की, बसू तरी! तू आहे कुठे पण?'

'अलाहाबाद! म्हणजे, प्रयागराज! गंगा किनारे आये है भैया! बस आता निघतो आहे. उद्या रात्रीपर्यंत मुंबई!'

'का रे, फ्लाईट नाही का?'

'नाही या वेळेस ट्रेन आहे. प्लॅटफॉर्मलाच आहे बघ! आता निघेल इथून.'

'अरे वाह, ट्रेन काय! बघ ते पिक्चर सारखं कोणी भेटतं का. काकी पण लय उतावळ्या झाल्या आहेत तुझ्या लग्नासाठी. सापडली तर बघच. चायला एक मस्त फिल्मी स्टाईल लव्ह स्टोरी पाहिजे न आपल्या ग्रुप मध्ये.'

'ओ भाऊ, होल्ड युअर हॉर्सेस! असं लाईफ मध्ये होत नसतं. आणि तुझ्या काकीला सांग, अजून एक्सप्लोर करू दे तिच्या पोराला. मग लग्न आणि सेटलमेंट.'

'म्हणजे आय शुड टेल युअर आई टू होल्ड हर हॉर्सेस?'

'एक्साक्टली!'

'शक्य आहे का ते तूच सांग!'

'हा हा हा!'

'बरं, सांग बरं कल्याण आलं की. येतो दादरला घ्यायला. जाताना लिटिल लिटिल टाकून जाऊ!'

'बस, तुमचं लिटिल लिटिल मध्ये बिग होऊन जातं बरं का! पण ये तू दादरला. फेरफटका मारून जाऊ. सांगतो तुला.'

'सांग, भेटू मग! बाय!'

'बाय!'

अंकुरने फोन ठेवला. उंचपुरा अंकुर आपल्या शुभ्र पट्ट्याचा शर्ट आणि ग्रे पॅन्ट मध्ये एकदम रुबाबदार दिसत होता. कोट आणि टाय तेवढा त्याने काढून ठेवला होता. कोरलेली दाढी, व्यवस्थित कापलेले केस त्याचा प्रोफेशनल लूक उठवून दाखवत होते. हातात महागडा मोबाइल, घड्याळ आणि छान जोडे होते. मनांतून मात्र तो अजूनही प्रभादेवीचा साधारण मराठी मुलगा होता. शिक्षणात प्रचंड मेहनत घेऊन त्याने चांगली नोकरी पटकावली होती. त्याचा त्याला गर्व नव्हता. उलट मेहनत करण्याची वृत्ती त्याने त्यातून अंगिकारली होती.

 

ट्रेनची शिट्टी वाजली आणि अंकुर आत चढायला लागला. दरवाज्यातून आत चढताना अचानक त्याला आवाज आला, 'भैया ए टू में जाना है, ए टू!'

एका बाजूनी एक मुलगी आणि तिच्यासोबत एक कूली दोन बॅग घेऊन येत होता. ट्रेनची शिट्टी वाजली आणि अंकुर आत चढायला लागला. दरवाज्यातून आत चढताना अचानक त्याला आवाज आला, 'भैया ए टू में जाना है, ए टू!'

अंकुरने डोकावून पाहिले. त्याचा ए टू डबा होता. अंकुरने तिला हात दाखवला आणि म्हणाला, 'ए टू!'

तिचे लक्ष अंकुरकडे गेले. पण तो उभा असलेल्या दाराच्या अलीकडेच ए टू चे दुसरे दार होते. ती मुलगी त्यातून चढली तेव्हा ट्रेन जस्ट निघाली होती. कुलीने कसेबसे सामान आत टाकले होते. पण तिने ट्रेन पकडली होती. अंकुर ते बघून आत जाऊन बसला. ती मुलगी सुद्धा आत आली आणि अंकुर समोर येऊन बसली. तिने आपले सामान ठेवले. अंकुरच्या समोरची तिची सीट होती. ती अंकुरला म्हणाली,

'थँक यु! बट इफ यु थॉट यु वूड हॅव गॉट युअर डी.डी.एल.जे. ऑर जब वी मेट मोमेन्ट, आय एम सॉरी टू डिसॅप्पोइंट.’, इतकं बोलून ती हसली.

अंकुरला पण ते ऐकून हसू आले. तो म्हणाला,

'वेल आय एम नॉट डेस्परेट टू कम्प्लिट इट, आय वूड रादर बी बॅटमॅन इन्स्टेड ऑफ अ राज ऑर आदित्य!'

'ओऊ! ओके सो मिस्टर ब्रूस वेन, मायसेल्फ प्रेमा दीक्षित फ्रॉम इंदोर.'

'अंकुर, अंकुर अग्निहोत्री फ्रॉम मुंबई.', हॅन्ड शेक करून अंकुर म्हणाला.

'मराठी?'

'हो, आपको आती है मराठी?'

'अरे मी मराठीच आहे.'

'पण इंदोर आणि मराठी?'

'मध्य प्रदेशमध्ये बरेच मराठी लोकं आहेत.'

'अच्छा, ठाऊक नव्हतं. खरं तर मुंबईतून बाहेर पडल्यावर कळतं, लोक का बोलतात, 'मुंबईकरांचा महाराष्ट्र कल्याणला संपतो आणि भारत पुण्याला!''

'हाहाहा, हो हा एक्सपेरियन्स मला पण अनेकदा आला आहे मुंबईकरांसोबत!'

अंकुरच्या चेहऱ्यावर स्मित होते. तो पुढे म्हणाला,

'बाय थ वे, बरं झालं तू लॉजिकल चॉईस निवडला. जवळच्या दारातून आत चढली. काजोलसारखं नाही केलंस!'

'हो आता समोर शाहरुखने कुठे हात पुढे केला! तो तर ब्रूस वेन निघाला.'

अंकुर फक्त हसत होता. प्रेमाने जीभ चावली. एका अनोळखी मुलाबरोबर इतक्या मोकळ्यापणाने आपण बोलतोय हे अचानक तिला जाणवले. का कोणास ठाऊक, अंकुर तिला अनोळखी वाटत नव्हता. अंकुरला पण प्रेमा हसरी आणि मनमोकळी वाटली, त्यांनी केवळ काही मिनिटे सोबत घालवली असून सुद्धा! खरं तर प्रेमा कडे बघितले तर ती हसऱ्या डोळ्यांची आणि ओठांवर हसू असलेली, गव्हाळ रंगाची, मध्यम बांध्याची छान दिसणारी, साधी सरळ मुलगी होती. तिच्या हास्याने आणि बोलण्याने मात्र अंकुरच्या मनांत एक लहर येत होती.

 

'सो व्हॉट डू यु डू मिस्टर ब्रूस वेन? मुंबईला रात्री बॅटमॅन बनून वाचवणं सोडून?', हसत प्रेमाने विचारले.

'ह्म्म्म, बॅटमॅन असतो तर दिवसभर झोपा काढल्या असत्या बघ. आणि पोटापाण्यासाठी काहीही करावं लागलं नसतं! पण आता मी रिजनल सेल्स मॅनेजर आहे. सो बॅटमॅन कमी आणि वंडरर अधिक आहे!'

'वो! फार फिरायला मिळत असेल न? सो नाईस!'

'काही नाईस नाही बरं का! फिरायला मला सुद्धा आवडतं. पण ह्यात हेक्टिक असतं. नो टूरीसम, ओन्ली टूर्स.'

'स्टील, काही तर बघायला मिळत असेल ना?'

'हो थोडं फार. फिरायची आवड होती म्हणून सहन करू शकतो आहे हे जॉब प्रोफाइल, इतकं मात्र खरं. व्हॉट अबाऊट यु?'

'आय एम ए टेकी. आय.टी. कंपनी मध्ये आहे. नोएडाला ऑफिस, पण मोस्टली घरून काम करते. इकडे गंगेचा तट बघायला या भागात आली होती. बस आज सुट्टी खतम, फिरसे काम शुरु!'

अंकुर आणि प्रेमाच्या गोष्टी रंगत होत्या. दोघांनाही समजत नव्हते, आपण इतके सहज एकमेकांमध्ये कसे मिसळलो. तेवढ्यात चहावाला आला. अंकुरने प्रेमाला विचारले,

'वुड यु लाईक सम टी?'

'ए टी काय रे? चहा म्हण चहा! चहा इस ए फिलिंग!'

'हा हा! बरं चहा घे तू!', त्याने चहावाल्याला दोन चहा मागितले आणि दोन चहाचे पैसे दिले. प्रेमाने त्याला आपल्या चहाचे पैसे देऊ केले. तो म्हणाला,

'इट्स फाईन. आय गॉट इट.'

'मिस्टर ब्रूस थ बिलिअनेअर, आई म्हणते अनोळखी लोकांकडून प्रवासात चॉकलेट घेऊ नये!', हसत प्रेमा म्हणाली.

'मग ही कुठे टॉफी आहे? टॉफी काय ही कॉफी पण नाही! साधा चहा आहे.'

'फार फार वाईट होता बरं का!'

'हा हा हा! घे चहा, गरम आहे.'

'चीअर्स!'

'अरे वाह! चीअर्स वगरे!'

'मला वाटलं मुंबईकरांना नॉर्मल वाटत असेल हे सगळं.'

'हेय डोन्ट वरी. मी मस्करी करतोय.'

'मी पण! फारसं जमत नाही हे सगळं मला तसही. बट असा काही अट्टाहास नाही की करावंच ऑर करू नये. बस कंट्रोल हवा. स्मोकिंग मात्र इस ए बिग नो!'

'गुड. स्मोकिंग मला पण नाही आवडत. अगदी अधीन होतो एखादा व्यक्ती त्याच्या, असं वाटतं मला!'

'खरं आहे. चहाचं मात्र व्यसन आहे मला. अंग्रेज चले गये...'

'...और चाय छोड गये!'

'हाहा, खरंच. एक अजून घेऊया का?'

अंकुरने चहावाल्याला पुन्हा आवाज दिला. यावेळेस प्रेमाने पैसे दिले. छान गप्पा सुरु होत्या. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. दोघांनी जेवण मागवले. प्रेमा म्हणाली,

'आपण वेगळ्या वेगळ्या डिश घेऊया. म्हणजे दोन वेगळ्या टेस्ट येणार.', अचानक ती थोडी अवघडली आणि म्हणाली, 'म्हणजे इफ यु डोन्ट माईंड हा! नाहीतर म्हणशील ही आज भेटली आणि काय खावं हे सुद्धा सांगते आहे.'

'इट्स ऑल राईट गं. मला पण आवडली आयडिया.'

प्रेमा हसली. दोघांनी जेवण मागवले आणि खाल्ले. तेवढ्यात टी.सी. आला. त्याने तिकीट तपासले. त्याने प्रेमाला विचारले,

'मॅडम, यहा बचे हुए बर्थ पे आनेवाले पॅसेंजर नही आये. लेडीस थे. अब ये कंपार्टमेंट में सिर्फ आप ही हो. आपको कोई प्रॉब्लेम नही ना?'

'नो सर, आय एम फाईन.'

'कुछ जरुरत हो तो ९०० पे कॉल करें.'

'यस सर, पर मैं ठीक हू.'

टी.सी. अंकुरकडे वळून म्हणाला, 'सर डोन्ट माईंड, प्रोटोकॉल है.'

'और जरुरी प्रोटोकॉल है सर! ये सुविधा आवश्यक है.'

टी.सी. हसला आणि निघून गेला.

'वाईट वाटलं का रे तुला, त्यांनी असं तुझ्यासमोर विचारलं तर?'

'उलट हायसं वाटलं! की आज रेल्वे फिमेल पॅसेंजरची अशी काळजी घेते. खरं तर चांगलं आणि वाईट दोन्ही वाटलं.'

'वाईट वाटलं तर!'

'तसं वाईट नाही बरं का! ही वेळ अजूनही येते, की फिमेल पॅसेंजरची वेगळी काळजी घ्यावी लागते, याचं वाईट वाटतं. आज मुंबईत मुली, स्त्रिया मोकळेपणानं फिरतात. रात्री मात्र लोकल ट्रेनमध्ये पोलीस पाहिल्यावरच धास्ती वाटते. बाहेर तर परिस्थिती अजून बिकट! जेव्हा ही परिस्थिती बदलेल तेव्हा खऱ्या अर्थाने बरं वाटेल. नाही तर मगाशी घरून फोन आला तेव्हा तू तुझ्या आईला म्हणाली नसती, एक मुलगी आहे कंपार्टमेंट मध्ये.'

प्रेमा ओशाळली. ती म्हणाली,

'अरे आईने पुन्हा प्रश्नांची सरबत्ती केली असती. म्हणून..'

'यु डोन्ट नीड टू जस्टीफाय. आय टोटली अंडरस्टॅंड. तुझ्याजागी मी असतो तर हेच केलं असतं.'

प्रेमा समाधानाने हसली.

 

वेळ सरला. प्रेमाने विचारले,

'तू कधी इंदोरला येत नाहीस का?'

'अद्याप आलो नाही. पण येणं होऊ शकतं कधी ना कधी.'

'आला की मी तुला फिरवेल. छप्पन भोग, सराफा! खूप खाऊ. उज्जैनला पण जाऊ.'

'मला यायला नक्की आवडेल. येईल मी.'

 

रात्र झाली. दोघेही झोपले. हा प्रवास संपू नये, असे कोणास ठाऊक का, दोघांनाही वाटत होते.

सकाळ झाली. इंदोर जवळ आले होते. अंकुर झोपला होता. प्रेमाने त्याला उठवले.

'अंकुर, सॉरी टू वेक यु अप, पण मी निघतेय. तुझा फोन दे, मी नंबर टाईप करते. कीप इन टच.'

अंकुरने तिला फोन दिला. तिने नंबर टाईप केला. त्याने सेव केला. प्रेमा म्हणाली,

'थँक यु फॉर मेकिंग माय जर्नी बेटर. डी.डी.एल.जे. नसलं तरी मला आवडलं, जब वी मेट, ब्रूस!', आणि ती हसली.

अंकुर पण हसला आणि म्हणाला,

'आय होप अवर पाथ क्रोसेस अगेन. मी मेसेज करेल.'

'वाट बघेल, बाय! आणि हॅपी जर्नी टिल मुंबई!'

'बाय!'

प्रेमा उतरली. अंकुरने पण आवरले आणि चहा घेतला. त्याला पुन्हा प्रेमाची आठवण आली. त्याने तिला मेसेज केला,

'आता एकटं चहा घ्यायला बोर होतंय!'

त्याला काही मिनिटात प्रेमाचा फोनच आला. त्याने हसून तो उचलला. पुढून आवाज आला,

'तुला एकट्याला चहा घ्यायला बोर होतंय तर माह्या बायकोले काऊन सांगू राहिला बे? पोलिसात कंप्लेंट करू का?'

'सॉरी? व्हू इस थिस?', अंकुर दचकला.

'काय सॉरी, काय व्हू?'

'प्रेमा दीक्षितचा हा नंबर आहे ना?'

'कोणी दीक्षित बिक्षीत न्हाई इथे. पुन्हा मेसेज नको करू समजलं?'

अंकुरने पटकन फोन ठेवला. त्याला आश्चर्य वाटलं. प्रेमाने आपल्याला चुकीचा नंबर का दिला हे त्याला समजेना. 'तिला आपला विश्वास बसला नाही का? की उगाच टाईमपास ती करत होती? मुद्दाम प्रॅन्क केला? की नंबर टाईप करताना चुकली?', निराश झालेला अंकुर विचार करत होता. त्याला आता पुढल्या प्रवासात मन लागत नव्हते. त्याने चहा पण घेतला नाही.

कल्याण आले. सम्याला काही त्याने फोन केला नाही. तो सरळ आपल्या घरी गेला. प्रेमाने असे का केले, हा विचार त्याला भेडसावत होता.

 

रात्री त्याला झोप लागली नाही. तो स्वतःला समजावू पाहत होता. 'इट्स ओके अंक्या! एकदा भेटली ती मुलगी. इतका काय विचार करायचा? लेट इट बी. उद्यापासून काम सुरु. जस्ट फोरगेट हर.'

दुसऱ्या दिवशीपासून तो कामात मग्न झाला. अधून मधून प्रेमाची आठवण मात्र त्याला येई, विशेषतः चहा पिताना. असे का होते आहे, त्याला कळेना.

 

तीन आठवडे गेले. अंकुरला त्याच्या सिनिअरने बोलावले. सिनिअर म्हणाला,

'हेय अंकुर, कॅन यु कव्हर इंदोर थिस वीक? इफ यु आर ओके, आय विल आस्क एच.आर. टू बुक अ फ्लाईट फॉर यु.'

अंकुरचे हृदय अचानक जोरात धडधडायला लागले. तो अचानक म्हणाला,

'येस येस, व्हाय नॉट? थँक यू सो मच सर!'

'सॉरी?'

'सॉरी सर. आय विल कव्हर इंदोर.'

अंकुरच्या चेहऱ्यावर इतके हसू का होते, ते त्याच्या सरांना कळलेच नाही.

 

दुसऱ्या पहाटे फ्लाईटने अंकुर इंदोरला गेला. त्याने आपली मिटिंग आटोपली आणि संध्याकाळच्या सुमारास तो छप्पन भोगला गेला. नजर मात्र प्रेमाला शोधत होती. तो स्वगत म्हणाला, 'हे सगळं पिक्चर मध्ये होत असतं अंक्या! लाईफ मध्ये नाही!'

दुसऱ्या दिवशी त्याची मिटिंग लवकर आटोपली. वेळ मिळाला म्हणून तो उज्जैनला गेला. त्याला वाटले, 'महाकालचे दर्शन घेऊन मनाला शांती तरी मिळेल.' कुठेतरी त्याला वाटत होते, प्रेमा त्याला भेटेल. पण विवेकबुद्धी म्हणत होती, 'हे सगळं पिक्चर मध्ये होतं. खरं नसतं असं काही!'

त्याने महाकालचे दर्शन घेतले आणि आईला मंदिराबाहेरून फोटो पाठवला. आईला ते बघून छान वाटले. संध्याकाळ झाली. तो बाहेर येऊन एका दुकानात गेला आणि म्हणाला,

'कॉफी देना भैया.'

अचानक त्याला आवाज ऐकू आला,

'ब्रूस, चहा सोडून कॉफी? अँड व्हाय डिडन्ट यु मेसेज मी इडियट?'

तो आवाज प्रेमाचा होता. त्याच्या मनांत आनंदलहरी उसळल्या. पण बळेच त्याने चेहऱ्यावर राग आणला आणि प्रेमाकडे बघून म्हणाला,

'तू चूक नंबर दिला तर मेसेज कुठून करणार मी?'

'चुकीचा नंबर? दाखव फोन.'

प्रेमाने जवळजवळ त्याचा फोन हिसकावून घेतला. तिने नंबर बघितला. शेवटचा सात आकडा तिने चुकून चार असा टाकला होता. तिने डोक्याला हात मारला. ती म्हणाली,

'माय बॅड. सो सॉरी!'

तिने लगेच तो नंबर डिलीट केला आणि बरोबर नंबरने स्वतःला मिस कॉल दिला. अंकुर म्हणाला,

'काय झालं? चुकला होता नंबर?'

'थांब, फर्स्ट थिंग्स फर्स्ट!', तिने लगेच त्याचा नंबर सेव केला आणि तोंड लहानसे करून म्हणाली, 'सो सॉरी!'

अंकुर हसला आणि म्हणाला, 'बावळट!'

ते ऐकून प्रेमा पण हसली. तेवढ्यात भैया कॉफी घेऊन आला. त्याला प्रेमा म्हणाली,

'ले जाओ वापस और दो चाय लाओ!'

अंकुर तिच्याकडे बघून स्मितहास्य करत होता.

'सो डिड यु मिस मी सेलिना काईल?'

'सेलिना म्हणजे बॅटमॅनची कॅट वूमन ना?'

अंकुरने मान डोलावली. प्रेमा लाजली. म्हणाली,

'नाही तर!'

'अच्छा! दिसलं बरं का!'

'हो, पण नाही आली आठवण, कारण मी तुला विसरलेच नाही ना!'

आता अंकुर लाजला. प्रेमा मनसोक्त हसली. अंकुरने विचारले,

'सो व्हॉट इस थिस प्रेमा?'

'वेल, मला असं इतक्या घाईने लेबल द्यायचं नाही याला. पण कॅन वी गो विथ थिस फिलिंग, स्पेंड सम टाइम अँड थेन टेक इट फर्थर? इस इट ओके?'

तेवढ्यात चहावाला चहा घेऊन आला. अंकुरने दोन्ही कप हातात घेतले आणि एक कप प्रेमाला देऊन म्हणाला,

'येस ऑफ कोर्स!'

प्रेमा सुंदर हसली. तिला बघून अंकुर हसला आणि दोघांनी चहाचा घोट घेण्याअगोदर एकमेकांना म्हटले,

'चिअर्स!'

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू