पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

व्रत वट पौर्णिमेचे

व्रत वट पौर्णिमेचे

 

( मैत्रिणी मधील काल्पनिक संवाद)

 " अग अग इतक्या सकाळी,नटून, थटून कुठे निघालीस लगबगीने.तेही नऊवारी साडी,नाकात नथ?)हातात पूजेचे ताट. साग्रसंगीत पूजेचा थाट.काही विशेष पूजा"?

 दुसरी "नेहमी शर्ट पँट मध्ये वावरणारी तू.दागिन्यांचा कंटाळा.आणि पूजा म्हणजे थोतांड मानणारी."

पहिली" स्वतःला नव्या युगाची नवी नारी म्हणवून अभिमानाने मिरवणारी"निघाली तरी कुठे?

( किंचित लाजत)

अग आज वट पौर्णिमा नाही का........ कालनिर्णय नुसार ?"

"तुला काय त्याचं सोयर सुतक? तू तर जाने,फेब्रु. वाली!"

"अग ऐकून तर घ्या.मी किनई वडाच्या पूजेला निघालेय."

तेही चक्क झाडाजवळ जाऊन.

आजी आणि तिच्या मैत्रिणी जायच्या तशी.झाडाला पाणी घालणार,दोरा गुंडाळणार,पूजा करणार,प्रसाद ठेवणार.आणि हात जोडून मागणार.

(काही तरी मोठ्ठी मागणी करायची दिसते) 

स्वतःशी : आजीच्या पिढीची चेष्टा केली " झाडाची कसली पूजा करता,ते काय देव आहेत? ऐकू येते का बोलतात? पुढे वय वाढले,झाडावर जाणे जमेना,नोकरी करणाऱ्यांना वेळ मिळेना.मग काय? झाडे कापून फांद्या घरी आणणे सुरू केले बायकांनी .

तोपर्यंत झाडे लावा,वाचवा,पर्यावरणाचा -हास थांबवा असे नारे सुरू झाले .( मी पण त्यात भाग घेतला हे सांगणे नकोच .) काही दिवस कागदाचे पट आले .काय आश्चर्य.सोईचे म्हणून जनता एकदम पुरोगामी बनली . पाश्चिमात्यांचे अंधानुकरण सुरू झाले.मी पण अपवाद नव्हते .

आणि अचानक आपल्या भारतीय संस्कृतीची आठवण आली .सारे श्रेय संस्कृतीला,आणि माझ्या नवरोबाला.

दर वर्षी बायका इतक्या भक्ती भावाने बायका वट पौर्णिमा व्रत का करतात ते गुपित कळाले. तुम्हाला उत्सुकता असेल न?

अहो! वडाचे झाड आपली प्रार्थना ऐकते,इच्छा पूर्ण करते असे कळले.मग काय? जन्माची इच्छा . हे वट वृक्षा मला पाव ,हाच पती जन्मोजन्मी मिळू दे अशी डोळे मिटून प्रार्थना केली.डोळे उघडले तर समोर चक्क वडा - पाव प्रसाद. लगेच वड पावला.तरी एक प्रश्न वडाने विचारला

" मुली तुला हाच नवरा का हवा?"

वट देवा इतका कामसू, आज्ञाधारी,नवरा कुठे मिळणार दर जन्मी?

हं! टकलू आहे म्हणून काय झाले? बरेचसे केस मीच उपटले आहेत .सांगू नका कोणाला.उगीच चढाओढ लागेल.चला मंडळी पूजेला उशीर होईल.हा नवरा हातचा जाऊ द्यायचा नाही. जय वट देवा????

 लेखिका

सुलभा गुप्ते.

९.२.२४

C ९०५,Athshri Baner 9967479920

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू