पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बांगड्या

 एकदिवस बांगड्यांचा खेळ खेळताना लहान नातु आजीला म्हणाला, "आजी, तू कां नाही घालत

चमकदार, सुंदर, सोन्याच्या, पिवळ्याधम्म बांगड्या??

 तुझ्यासाठी मी मोठा झालोकीं आणेन... "आजीने काहीं उत्तर दिले नाही म्हणून त्याने

पुन्हा-पुन्हातेच- तेच विचारत होता... आजी काय विचार करतेय?? बोलत कां नाही??

 तिला आपल्या लहानपणी बघितलेली एक घटना डोळ्या समोरून चित्रपटा सारखी दिसूलागली......

पण सर्वात लहान बहिणीने आधीच खिडकी पकडून ठेवली होती त्यामुळे माझा नंबर अगदी रात्र झाली तेंव्हा आला... तोही त्या तीघी झोपल्यावर... एका बाजूला आई बसून होती आणि खिडकी जवळमी... तशी रात्र काळी कुट्ट होती. सर्व अंधारी अंधार.. फक्त स्टेशन आलकीं काहींवेळ धाव पळ आणिक उजेड दिसायचा.... बहुतेक सर्व झोपी गेले बघून कंपार्टमेंट चे मोठे लाईट पण विजवले गेले होते... केवळ बाजूच्या रुळावरून दुसरी ट्रेन निघाली की तिचा धडधडणंअंधाराला कापत जाणारा ट्रेन चा मोठा पुढचा दिवाआणि नंतर काहीं दिवेलागलेले

डबे इंजिन घरंगळत मागे - मागे जाणारे ते, मोजण्याचे... आणि पळणारी झाडं मोजून मी थंड वारा अंगावर घेत गाणी गुणगुणत बसले होते.. अचानक बाजूच्या रुळावरून दुसरी फास्ट ट्रेन धडधडत निघाली. धुप्प अंधारात मधुनच एखाद्या डब्यातून प्रकाश पडायचा.... तितक्यात दोन्ही ट्रेनच्या मधून जोरदार आवाज टप-टप-टप-टप

" मोनू, माझ्या जवळ ये आता झोपायची वेळ झालीय मी तुला छान गोष्ट सांगते. "

आजीची गोष्ट ऐकून मोनू शांत झोपला पण आजीची मात्र झोप उडाली होती..

 परीक्षा संपली आणि आई बरोबर चौघी बहिणी आपल्या बाबांना

भेटायलाआणि गावांत दोन महिनेसुट्टी च्या गमती-जमती करायची स्वप्नं बघत ट्रेन मधे बसल्याहोत्या..

खिडकी जवळ कोणी बसायचे यावरून भांडू लागल्या तेंव्हा आईने समजावून सांगितले आळिपाळिने. बसा.. मोठी बहीण नंतर मधल्या दोघी नंतर सर्वांत लहान सर्वजणी तासतासभर बसा आणि रात्री नीट झोप घ्या म्हणजे प्रवासाचा थकवा जाणवणारनाहीं. ""

 जसेकाहीं चार सहा घोडे पळत असावेत. अंदाज घेतंच होते आणि खूपजोरात किंकाळ्या ऐकू आल्या त्यानंतर हाय मार डाला... व बचाव.. बचाव.. असे काहीसे शब्द ऐकू आले पण बाजूचीट्रेन धडधडत निघूनही गेली होती आणिक घोड्यावर बसलेला. एक स्वार अट्टाहास करत एक सोन्याच्या किंमती बांगड्यांनी भरलेला हात.... हातात घेऊन जातानाही दिसला. पण तितक्यात पोलिसांनी शिट्या वाजवल्या आणि ट्रेन ची स्पीड अचानक वाढवलीय असे वाटले आणि खूप घाबरून खिडकी सोडली व आईला बिलगून बसलेहोते मी खूपघट्ट मिठी मारली आईला.

त्या दिवशी ट्रेन मध्ये बसले असताना मी एक निर्धार केला होता कि सोन्याचे दागिने सोन्याच्या बांगड्या 

कधी घालून मिरवायचं नाहींआज पुन्हापुन्हा ती रात्र तो ट्रेन चा प्रवास आठवतोय ज्या मुळे मला. सहजपणे... दागिन्यांचा... 

मोह सोडता आला होता आणि मोनू झोपून उठल्यावर 

त्याच्या प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची हे ही मनोमन ठरवून. ठेवले.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू