पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एक्स्पायरी डेट

एक्स्पायरी डेट
(प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार )
जीवनात सत्ता, ताकद आणि जवानी यांना खरे तर एक्स्पायरी डेट असते. त्याचा आपण कधी  विचारच करत नाही. आयुष्य जगण्यात आपण इतके मग्न झालेलो असतो की त्याचा आपणास विसर पडतो. त्यासाठी माणसाने ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी करून आनंदी जीवन जगायचे असते. बघा ना सत्ता मग ती घरातील असो किंवा सार्वजनिक जीवनातील. त्याला देखील एक्स्पायरी डेट असते. काही काळ सत्ता उपभोगली की आपण हून बाजूला व्हायचे असते. लोकांनी किंवा घरातील मंडळींनी बाजूला करायची वाट बघायची नसते. मुले एकदा कमवती झाली की आपण फारशी लुडबुड करायची नसते. सत्ता गाजवण्याचे एक विशिष्ठ वय असते. आपला शब्द जोवर मानला जातो तोवर तो फेकण्यात अर्थ असतो. अंगात जोश ताकद असते तोवर आपण काहीही करू शकतो. सत्ते प्रमाणे ताकदीला देखील एक्स्पायरी डेट असते. ती असते तोवर आपण स्वावलंबी असतो. एकदा का ती संपली की आपण परावलंबी होतो. आपल्याला दुसऱ्याचा आधार लागतो. तीच गोष्ट जवानीच्या बाबतीत आहे. आपण जो पर्यंत सुंदर दिसतो तो पर्यंत आपल्या भोवती मैत्रीचे मोहोळ असते. एकदा का शरीरावर सुरकुत्या पडल्या की आपण एक्स्पायरी डेट च्या जवळ गेलो असे समजावे. आपण किती सौदर्यवान होतो याची बढाई मारण्यात त्यावेळी काहीही अर्थ नसतो. एक्स्पायरी डेट कोणालाही टाळता येत नाही. त्यामुळे त्याच्या जवळ आपण जो पर्यंत जात नाही तोवर सर्व गोष्टींचा उपभोग घ्यावा. एक्स्पायरी डेट ला कोणताही उपाय नाही. औषधाला एक्स्पायरी डेट असते. त्यानंतर ती फेकून दिली जातात. सत्ता ताकद जवानी यांचा देखील एक्स्पायरी डेट नंतर काहीही उपयोग नसतो. हे सत्य आहे ते नाकारून चालणार नाही. 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू