पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अभिसारिका

माझ्यातलीमी समूहाच्या ॲडमिन संगीता देवकर यांच्या उपक्रमानुसार…


मंगेश पाडगावकरांच्या या चार काव्यपंक्तींना माझ्या शब्दात पुढे नेण्याचा हा प्रयत्न

________________________


भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची

धुंद वादळाची होती रात्र पावसाची


कुठे दिवा नव्हता गगनी एकही न तारा आंधळ्या तमातून वाहे आंधळाच वारा

________________________


            अभिसारिका

 

धरेवरी धावत होते, ओहळ सुसाट

पावलांना अडवत होती, नागमोडी वाट

मला मुळी नव्हती आशा, तुझ्या आगमनाची 

धुंद वादळाची होती, रात्र पावसाची


रजनीच्या गर्भामधूनी, गर्द अंध:कार

अभिसारिका बनुनी आली, मजसाठी नार

धारांच्या पटलाआड, मूर्त लावण्याची

धुंद वादळाची होती, रात्र पावसाची


अंगावर उठला माझ्या, भयचकित शहारा

नयनांची ग्वाही, परि, वाटे आभास सारा

सौदामिनीस शक्ती, तिमिरास भेदण्याची 

धुंद वादळाची होती, रात्र पावसाची


प्रतीक्षेची अवचित पूर्ती, मनसागरा उधाण 

जाणिवेच्या पलीकडली, श्वासांची जाण

तुजलाही याद असे का, त्या गोठल्या क्षणाची 

धुंद वादळाची होती, रात्र पावसाची


भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

२५-२-२४


©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. आपल्याला ही कविता आवडल्यास लाईक करून नावासह शेअर करायला काही हरकत नाही.


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू