पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मराठीचे महिमान

काय सांगू महिमान

किती वर्णू मराठीला

हिरे माणके नि रत्ने

        हिच्या लाभले गाठीला॥धृ॥

गंध चंदना परि हा

मराठीचा दर्वळला

कवी सुरेश भटांनी 

      हिच्या लिहिल्या गझला॥१॥

काव्य आम्हीही लिहिले

त्यांच्या गायिल्या गझला

स्मृती शिवजन्म दिनी

          पुन्हा वंदिले आज ला॥२॥

राज भाषेचा सन्मान 

राजा शिवबाने दिला

टिळा कुसुमाग्रजांनी

         हिच्या मातीचा लाविला॥३॥

स्वाद हिचा अमृतात

ज्ञानेश्वरांनी पाहिला

ग्रंथ लिला चरिताचा

              महानुभावे लिहिला॥४॥

अनुभव हे गाठीला

आली घेऊन मंगला

किती करु गुणगान

           म्हणे जीव हा दंगला॥५॥

     *--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव. 

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू