पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अगं ती कोण होती?

आम्ही सहा मैत्रीणी , दिती ,(अदिती) साधना, मीरा , सोनी,(सुहासिनी )विनी,(विनीता)अणि काव्या,।हमसफर ट्रेन नी श्रीशैलम दर्शना साठी हमसफर ट्रेन नी हैदराबाद ला जाण्या साठी स्टेशन वर पोहोचलो ,सर्वच साठाच्या वरच्या , सोडायला प्लेटफार्म वर आमचे नातवंड ,सुना ,मुल ,सगळेच आले होते त्यानींच आमच्या सगळ्यांचे लगेज व्यवस्थीत बर्थ खाली जमवले पाण्या ची पाचलीटर ची केनसाईड टेबल वर ठेवली आणि खाली उतरले साईड च्या काचेत आम्ही साही जणी त्यांना हाथ हालवत बाय करत होतो ते सगळे बाहेरुन हाथ आणि होठ हालवत आम्हाला निरोप देत होते हळु हळु ट्रेन सरकत होती आणि छोटे नातवंड इवलेसे तोंड करत नुसते पहात होते ,लवकरच गाडी नी स्पीड पकडली आम्ही पण आप आपल्या बर्थ वर बसलो । आता ट्रेन चे निरीक्षण सुरु झाले कारण ही नवीन सुरु झालेली हमसफर ट्रेन मधे आमचा पहिलाच प्रवास होता.

मीरा वरच्या बर्थ वर जाण्या साठी साइड च्या स्टेपवर पाय ठेवत म्हणाली बघा वर चढण किती सोप्प आहे ग सोनी म्हणाली अग प्रत्येक बर्थ वर चार्जिंग पाइंट आहे,दिती ला तर दोन्ही बर्थ मधल्या मोकळ्या जागेचे कौतुक वाटले ,सुजाता काही बोलणार तेवढ्यात सोनीआणि विनी बाथरुम चे निरीक्षण करुन आल्या ।सर्वांना ही ट्रेन खुपच आवडली ,दिती नी लगेच बर्थ च्या खालच्या दोन अटैच्या बाहेर काढुन मधे लावल्या ,बेग मधुन पत्ते जोड काढला अण लगेच ए चला या, ग ,अमोर समोर बसा ,सिक्वेन्स खेळायच न तेवढ्यात टीसी आला त्याने आम्हाला पहात स्वथा च्या चार्ट मधे पाहुन आम्हा साही जणी चे नाव उच्चारले, आणि खात्री करुन पुढे गेला ।आमचा सिक्वेन्स चा एक डाव पुर्ण झाला , आता सकाळ चे आठ वाजले होते ,घरुन पाहटे साडे पाच ला स्टेशन वर येउन गेलो होतो , दिती म्हणाली चला आता आपण आपला आणलेला नाश्ता करुन घेऊ ,पण आधी जे गरम आणि गर्मी मुळे खराब होण्या सारखे असेल ते काढून संपवु या ,मग काव्या ,मीरा नी डबे उघडले त्यांचे खमण,तिखत पुर्या, दही आणि फ्रुटचाट चा भरपेट नाश्ता झाला. 

आता गाण्या च्यी भेंड्या सुरु झाल्या गाणे त्या मधे थोडी आपसात जुगलबन्दी पण चालत होती असाच बराच वेळ खेळुन, गाऊन हासुन आता थकायला झाले एआता थोड्या वेळ पडूया आम्ही आप आपल्या बर्थ वर जाउन बसलो सुजाता म्हणाली अग मी जरा बोगी पुर्ण पाहुन येते तिच्या बरोबर काव्या पण गेली , काही वेळा नन्तर दोघी आल्या ,अग आपल्या बोगी खुपच कमी लोक आहेत ए आता थोडी भिती वाटते ग , अग आपण त्या टीसी ला विचारायच का ? सोनी म्हणाली ।

सकाळी उठल्या वर आपसात चहा काफी ची गरज कधी पुर्ण होते त्या करता कधी ट्रेन थांबणार ,आणि तिथे चहा काफी मिळणार की नाही ह्यावर चर्चा चालत होती ,आठ वाजुन गेले तरी अजुन चहा नाही, म्हणजे काय , दिती ला फारच घाई झाली होती , ती म्हणाली का ग ते चहा घेऊन येतात न ट्रेन मधे ,आपल्या बोगीत तर काल पासुन कोणीच आले नाही ,कोणी तर सांगत होते की नाश्ता जेवण चहा पाणी सर्वच मिळत म्हणे अश्या फास्ट ट्रेन मधे , ए मीरा विचार ग त्या टीसी ला बघ तर विचारुन , मी म्हणले अग आम्ही काल जेव्हा रिकाम्या बोगी बद्दल विचारायला गेले होते तेव्हाच विचारले ,त्याने सांगीतले कि ही नवी ट्रेन आहे, पेसेंजर वाढतिल मग सर्व सुवीधा मिळतील ।साडेआठ ला एक स्टेशन आले आणि सुयोगा ने आमच्या बोगीच्या दरवाजा समोरच चहा चा स्टाल दिसला ,मी आणि काव्या लगेच उतरुन त्याला चहा आणि काफी है न? कितना चाहिऐ ? आम्ही त्याचे कप बघुन प्रत्येकी साठी दोन एकुण सहा कप चहाआणि सहा कप काफी मागीतली आणि त्याला म्हणले भैया अन्दर पहुचा देंगे, त्याने लगेच म्हणले , नही भेंजी गाडी जादा रुकेगी नही आप वापस जल्दी बैठ जाओ। हे बोलत बोलत त्याने आमचे चहा काफी कप भरून समोर त्याच्या टेबलावर

ठेऊन ही दिले होते ,आम्ही दोघी एक एक कप दारा पर्यन्त आलो मी माझा कप काव्या ला दिला मी तिच्या कडुन ते दोन्ही कप घेउन वर आलो।, तेवढ्यात भेंजी ये प्लेट लेलो पाहीले तर ती एक छोटीशी दहा बारा वर्षांची मुलगी होती तिच्या प्लेट वर आमचे चहा काफी चे ते बाकी चे छोटे ग्लास होते ,आम्ही लगेच तिच्या हातातली प्लेट घेतली तिला काही विचारु पण ट्रेन नी स्पीड पकडली आम्ही सगळ्यानी आप आपली काफी आणि चहा चे दोन दोन कप संपवले पण ती मुलगी तिथे कुठुन आली आम्ही खाली उतरलो होतो तेव्हा तर स्टाल वर फक्त तो एक माणुसच होता न ,मी काव्या ला विचारले ती पण अग हो न कुठुन आली असेल न, ही चिमुरडी ।आपल्याला ही प्लेट देण्या करता,अग पण आता ही तिची प्लेट तिला आपण कधी देणार आपले परती चे तर फ्लाईट चे टिकीट आहे न आम्ही सहाजणी पण सगळ्याच निशब्धच बसल्या होतो तेवढ्यात एक निळा शर्ट पांढरा पायजामा घातलेला एक मुलगा हातात एक छोटी झाडु आणि कपडा घेउन बोगी साफ करायला लागला आमच्या सीट च्या खालुन तो झाडुन पुढे निघत होता तेव्हां मी त्याला विचारले बेटा तुम यहीं से इस बोगी मे चढे हो क्या सफाई के लिए तो म्हणाला नहीं मै सुबह सात बजे ड्युटी पे आता हुं और बारा बजे एक बडा टेसन बलसाड पर उतरकर वापस मैरे घर जाउंगा मी त्याला ती प्लेट दाखवली आणि विचारले ये प्लेट अभी जहां ये गाडी रुकी थी न वांहासे हमने चाय काफी के बारा कप लिए थे ,कप तो डस्टबीन डालदिए पर ये प्लेट तो काम की होगी न तुम पहुंचा सकते हो उस छोटी बच्ची के पास?

तो म्हणाला आज आपके पा छोड गई क्या ये प्लेट। वो मैरी भेन हे ,वो मेरे साथ सुबह घर से आती हे, ये टेशन पर मेरे मामा की चायकाफी दुकान है । वो मामा की मदत करती है, मेरै आने तक ये प्लेट में कप रख कर वो बोगी में देने को जाती है। मै ले जांउगा, अभी आता हुं ,बोगी साफ करके । खरच तो एक तास भरानी आला आणि प्लेट घेऊन जात होता आम्ही त्याला आणि त्याच्या बहीणी साठी पन्नास रुपयां च्या दोन नोटा दिल्या तो घेत न्हवता पण आम्ही सगळ्यानीच त्याला समजवुन सांगीतले तेव्हां तो पेसे घेतले ।त्याचे स्टेशन आले तेव्हा तो ती प्लेट घेउन उतरुन निघुन गेला सध्याकाळी पाच वाजता आमचे हैदराबाद चे स्टेशन आले ,तोपर्यन्त आम्ही त्या भाऊ बहीणीं च्या गप्पांमधेच होतो । दिती म्हणाली ए पण काही ही म्हणां हं चहा ची तल्लफ किती लागली होतीन ,काय सांगु ,अणी तुम्ही जे दोन दोन कप एकत्र कप आणलेत न त्याने मी तर एकदम त्रप्त झाले होते ।मीआणि काव्या दोघी त्या चिमुकली चा मना पासुन आभार व्यक्त करत होतो कशी आली एकदम आपल्या समोर !

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू