पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझी अमृता मराठी

माय बोलते जी बोली

नाव तिचे मायबोली

महाराष्ट्रा ची मराठी 

       हिच्यातून उद्भवली॥धृ॥

मायबोली प्रसाराने

राजभाषा प्रसवली

जरी मराठी बिकट

   आम्हा साठी प्रकटली॥१॥

अभिमान मराठीचा

प्रिय तशी मायबोली

मधुरस बोलीतून 

     घोळविते मायबोली॥२॥

जरी राकट मराठी 

धड धाकट बोलली 

जशी राकट तशीच 

   मृदु बोल ही बोलली॥३॥

समुद्राहूनही खोल

जरी मराठीची खोली

ओठा ओठांवर सार्या 

     ज्ञानदेवे रुजविली॥४॥

जोति-साऊंनी ओळख

हिची अवघ्यांना दिली

लेकी बाळींना सुनांना

   तेंव्हा परिचित झाली॥५॥

 इंग्रजीच्या प्रभावाने

जरी थोडी संकोचली

कशी मरणार हिला

माती महाराष्ट्री लाभली॥६॥

कशी हरेन मराठी 

ओठा ओठात रुजली

माझी तरेन मराठी

जशी अमृताच झाली ॥७॥

        *--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*,प्लाॅट नं. ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव. 

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

********************************

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू